SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

5 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये गाडी धावणार 200 किमी; जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

खरं तर वाढत्या पेट्रोल- डिझेलच्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक वाहने चांगला पर्याय ठरत आहेत. पण त्यांच्या वाढत्या चार्जिंग खर्चामुळे सर्वसामन्यांची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. वाहनं चार्ज करण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो.

अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांसाठी जगभरात अनुकूल वातावरण तयार होत आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. तसेच भारतात विविध शहरांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांसाठीचं चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं काम सुरू आहे. पण या सगळ्यात वाहनांचा चार्जिंग प्रश्न कायम आहे.

Advertisement

एक इलेट्रिक वाहन पूर्णपणे चार्ज करण्यासाठी किमान 5 तास किंवा त्याहून अधिक वेळ लागतो. पण यावर चीनच्या Huawei कंपनीने उपाय शोधून काढला आहे. ही कंपनी एका अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्याद्वारे इलेक्ट्रिक वाहन केवळ 5 मिनिटांत चार्ज होइल, ज्यावर ते 200 किमी लांब चालेल. Huawei चं हे तंत्रज्ञान अस्तित्वात आलं तर जगभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाजारात मोठी क्रांती होऊ शकते.

कंपनीने 2021ला चीनमध्ये स्मार्ट ड्रायव्हिंग सोल्यूशन ड्राइव्ह वन इन चायना रोलआऊट केले. हे एक स्मार्ट IoT इंटीग्रेशन असून हारमनी ओएस नेव्हिगेशनवर चालते. याच्या मदतीने बॅटरी 10 मिनिटं चार्ज केल्यावर ते वाहन तब्बल 100 किमीपर्यंतची रेंज देऊ शकतं. तसेच कंपनी याच तंत्रज्ञानावर अधिक संशोधन करून 100OV EV चार्जिंग सोल्यूशनची निर्मिती करेल ज्याद्वारे इलेक्ट्रिक वाहन 5 मिनिटांत चार्ज होईल व ते 200 किमीपर्यंतची रेंज देईल, असं चायनीज इलेक्ट्रिक व्हेईकल 100 फोरमचे पॅनेल सदस्य, Huawei चे वरिष्ठ अधिकारी वांग चाओ म्हणाले.

Advertisement

कंपनी हाय-व्होल्टेज चार्जिंगवर काम करत असून या 1000V 600kw हाय-व्होल्टेज चार्जिंगच्या मदतीने, इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी 5 मिनिटांत 30 टक्के ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल. हे इतकं फास्ट असेल की, वाहन चालकांना फ्यूल टँक भरण्यासारखा अनुभव मिळेल, असे चाओ म्हणाले.

 

Advertisement