SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

स्मार्टफोन युजर्ससाठी मोठी बातमी; नेटवर्क नसले तरी करता येईल कॉल

फोन कोणताही असला तरी नेटवर्कची समस्या ही सारखीच असते. फक्त ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागात देखील ही समस्या प्रकर्षाने जाणवते. अनेकदा खूप भारी, महागडा फोन आपल्याकडे असतो पण एखादा महत्त्वाचा फोन कॉल करण्यासाठी फोनमध्ये नेटवर्क नसते. कॉल करण्यासाठी सिम म्हणजेच मोबाइल नेटवर्क असणे गरजेचे आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स सध्या वॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय देत आहेत. ज्यामुळे आपण बिना मोबाईल नेटवर्क देखील इतरांना फोन कॉल करू शकतो.

याच पार्श्भूमीवर आज स्मार्टफोनमध्ये असणाऱ्या एका खास फीचर विषयी आपण जाणून घेणार आहोत. नेटवर्क नसतानाही आता चिंता करण्याचे कारण नाही. ”वायफाय कॉलिंग फीचर” मुळे आता आपल्याला संवाद साधता येणार आहेत. हे फीचर अँड्रॉइड फोनमध्ये देखील काम करते.

आपण ‘WiFi Calling’ फीचरच्या मदतीने मोबाइल नेटवर्क नसतानाही कोणालाही कॉल करू शकतो. हे फीचर सध्या सर्वच फोनमध्ये उपलब्ध आहे. या फीचरला अॅक्टिव्हेट केल्यानंतर आपण सहज नेटवर्कशिवाय कोणत्याही मित्र मैत्रिणी, नातेवाईकाशी संपर्क साधू शकतो. मात्र, या फीचरचा वापर करण्यासाठी आपण WiFi शी कनेक्ट असणे गरजेचे आहे. हे फीचर WiFiनेटवर्क सपोर्टच्या मदतीने काम करते.

वायफाय कॉलिंग फीचर कसे अॅक्टिव्हेट करायचे :-

तुम्ही जर iPhone यूजर असाल व हे फीचर अॅक्टिव्हेट करायचे असल्यास सेटिंग्समध्ये जाणे. येथे Mobile Data चा पर्याय मिळतो. पर्यायावर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली WiFi Calling चा पर्याय येतो. त्यानंतर WiFi Calling On This iPhone च्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आयफोनमध्ये हे फीचर सुरू होईल.

अँड्रॉइड फोन मध्ये कसे वापरायचे :-

फोनच्या सेटिंग्समध्ये जाणे. WiFi चा पर्याय निवडणे. यावर क्लिक करताच तुमच्यासमोर WiFi Calling चा पर्याय येतो. या फीचरला ऑन करून आपण विना नेटवर्क कॉलचा आनंद घेऊ शकतो.

अशा प्रकारे आता कॉल करण्यासाठी नेटवर्कची समस्या बऱ्यापैकी मिटली आहे. हो.. पण वायफाय कॉलिंग करण्यासाठी देखील वायफायला कनेक्ट असणं गरजेचं आहे, हे विसरता कामा नये.

Advertisement