SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हा’ संघ ठरला आयपीएल-2022 चा विजेता संघ, केली खास कामगिरी..

इंडियन प्रीमियर लीगच्या 15व्या हंगामात गुजरात टायटन्स (Gujrat Titans) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या पॉवरफुल संघांमध्ये काल (ता. 29 मे) फायनल मॅच झाली. गोलंदाजांची कमाल, शुभमन गिलची आकर्षक खेळी आणि शेवटी डेव्हिड मिलरच्या फिनिशिंग टचच्या जोरावर गुजरात टायटन्सने पदार्पणातच आयपीएलच्या विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे.

सामना सुरू झाल्यानंतर राजस्थानची फलंदाजी कोलमडल्याचं दिसलं. टॉस जिंकून फलंदाजीला आलेल्या राजस्थानने पहिल्या 6 षटकात 44 धावा जोडल्या. वेगवान धावा करण्याच्या नादात यशस्वी जैस्वाल 16 चेंडूत 22 धावा करून बाद झाला. राजस्थानकडून या सामन्यात जोस बटलरने सर्वाधिक 39 धावा केल्या. संजू सॅमसनने 14, देवदत्त पडिकलने 2, सिमरन हेटमायरने 11 धावा केल्या.

Advertisement

 

📱 Paytm Money App वर ट्रेडिंग अकाउंट उघडा आणि कमीत कमी ब्रोकरेज मध्ये करा जबरदस्त ट्रेडिंग..!!

 

Advertisement

गुजरातचा कॅप्टन हार्दिक पंड्याने खास कामगिरी करत तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने 1, राशिद खानने 1, साई किशोरने 2 तर यश दयाळने 1 विकेट घेतली. गुजरातच्या बॉलर्सनी राजस्थानवर पहिल्यापासूनच दबाव निर्माण केला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सला 20 ओव्हरमध्ये फक्त 130 धावाच करता आल्या.

गुजरातने राजस्थानकडून मिळालेले 131 धावांचे माफक लक्ष्य 18.1 षटकांत फक्त 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 133 धावा करून पूर्ण केले. गुजरात टायटन्सने प्रथमच IPL 2022 मध्ये फायनल खेळताना अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करत पदार्पणातच IPL-2022 च्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.

Advertisement

राजस्थानने सुरुवातीच्या काही षटकांत ऋद्धिमान साहा 5 आणि मॅथ्यू वेड 8 यांना बाद करून सामना बरोबरीत आणण्याचा प्रयत्न केला, पण यानंतर हार्दिक पंड्या आणि शुभमन गिल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी करत गुजरातला थोडंसं यश मिळवून देत धावसंख्या पुढे नेली. युजवेंद्र चहलने जैस्वालकरवी झेलबाद करून हार्दिक पंडय़ाला बाद केलं. हार्दिक पंड्याने 34 धावा केल्या मग गिल आणि डेव्हिड मिलर (नाबाद 32) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली. शेवटी शुभमन गिलने गुजरातला विजयी षटकार ठोकून सामना संपवला.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement