पुणे :
मागच्या आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याचे दर वाढत चालले असल्याचे दिसून आले मात्र आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या दरात घसरण झाली असल्याच्या पाहायला मिळाले. आता पुन्हा आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात किरकोळ वाढ होणार असल्याचे सांगितले जात होते मात्र सोन्याचे दर आज स्थिर आहेट. फक्त सोनेच नाही तर चांदीचे दरही स्थिर आहेत.
आज (सोमवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,750 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,200 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करता आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम देशांतर्गत दरावर जाणवत असतो. आंतरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सध्या सोन्या चांदीचे दर स्थिर आहेत परिणामी भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) तसीच अवस्था आहे.
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,750 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,850 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,200 रुपये (प्रति किलो)