SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

ऑनलाईन बँकिंग करताय? बँक अकाउंट रिकामं होण्यापूर्वी ‘ही’ खबरदारी घ्या..

बँक म्हटलं की ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही व्यवहार करणाऱ्यांची संख्या वाढलीच. पूर्वीसारखं बँकेत जाऊन रांगेत उभं राहून फॉर्म घ्यायचा आणि तो भरून दिला की काही दिवसांत आपलं अकाऊंट उघडायचं पण आता घरबसल्या काही मिनिटांत तुम्ही डिजिटल बँकिंगच्या विश्वात पाऊल ठेवू शकता. ज्यामुळे लोकांचा वेळ आणि मेहनत दोन्ही वाचून बँक व्यवहार ऑनलाईन (Digital Banking) करता येतात. पण अशा वेळी तुम्ही फसवणुकीला बळी न पडण्यासाठी वाचा काही महत्वाच्या गोष्टी..

डिजिटल बँकिंगमुळे आपल्या खात्याची सुरक्षितता महत्वाची आहे. सायबर गुन्हेगार लोकांची खाती रिकामी करत असतात असं आपण ऐकलंच असेल, म्हणून आपला डेबिट कार्ड पिन बदलावा लागेल किंवा ओटीपी सांगा असं कोणी कॉल करून विचारत असेल तर तुम्हीच त्याला प्रतिप्रश्न करा. इतर घरातील जाणकार व्यक्तीकडे कॉल देऊन आवश्यक गोष्टींची खात्री करा म्हणजे आपल्या बँक डिटेल्स सुरक्षित राहतील.

Advertisement

बँक अकाउंट डिटेल्स बाबत काही संशयित कॉल्स, फ्रॉड झाला तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लगेच तक्रार करा.

आपल्याकडील Google Pay, Phonepe, Paytm व इतर बँकिंग ॲप्सला पासवर्ड, पिन, फिंगरप्रिंट टाकून ठेवा म्हणजे तो तुम्हालाच माहीत असल्याने ॲप्सचा तुम्हीच वापर करू शकता.

Advertisement

पोलीस प्रशासनापासून बँका आणि अनेक वित्तीय संस्था लोकांना ऑनलाइन फसवणुकीबाबत वेळोवेळी सावध करतात, त्यांच्या सुचनांचं आणि खबरदारीचं पालन करा.
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक SBI लोकांना बनावट मेसेजेसबाबत सावध राहण्यास वारंवार सांगत असते.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 Paytm Money App वर ट्रेडिंग अकाउंट उघडा आणि कमीत कमी ब्रोकरेज मध्ये करा जबरदस्त ट्रेडिंग..!!
➖➖➖➖➖➖➖➖➖
SBI ने आपल्या एका मेसेजमध्ये सांगितले की,”जर एखाद्या युझरला त्याचे बँक खाते ब्लॉक झाल्याचा मेसेज आला असेल तर तो मेसेज पूर्णपणे बनावट आहे. अशा मेल किंवा मेसेजेसना कधीही रिप्लाय देऊ नका. असे बनावट मेसेज मिळाल्यावर लवेच तक्रार नोंदवा.

लॉटरी जिंकणे, इन्कम टॅक्स वाचवणे, नकली ऑफर्स, अनोळखी नावांवरील ईमेल, SMS मधील लिंक किंवा अटॅचमेंटवर कधीही क्लिक करू नका. अपेक्षेपेक्षा जास्त डिस्काऊंट किंवा फ्री गिफ्ट्सच्या अशा गोष्टींवर भुलू नका.

कोणासोबतच आपला बँक अकाउंट नंबर, ATM किंवा डेबिट कार्ड क्रमांक, पासवर्ड आणि OTP शेअर करू नका. पासवर्ड वेळोवेळी सहा महिन्यातून कमीत कमी एकदा तरी बदला.

Advertisement

जर तुम्हाला डिजिटल बँकिंग अनुभवताना काही संशयास्पद हरकत दिसली असेल तर अधिक माहिती घेण्यासाठी खालील वेबसाईटला भेट द्या 👉 https://cybercrime.gov.in/

ज्या रेस्टॉरंट, हॉटेल्स, रेल्वे स्टेशन अशा बऱ्याच ठिकाणी फ्री वाय-फायचा आनंद लुटत बसू नका कारण Free Wifi वापरून पैशांचे व्यवहार केल्यास तुमचं बँक अकाउंट रिकामं होण्याची शक्यता जाते. म्हणून काळजी घेऊनच व्यवहार करावेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement