SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हे’ अ‍ॅप ओळखणार बनावट नोटा, लगेच करा ‘डाउनलोड’..!

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) नुकताच 2020-21चा अहवाल जाहीर केला.. त्यात बनावट नोटांचे (Fake notes) प्रमाण प्रचंड वाढल्याची धक्कादायक बाब समोर आली.. त्यातही बनावट नोटांमध्ये 500 रुपयांच्या नोटेचे प्रमाण सर्वाधिक आहे. या नोटा हुबेहुब खऱ्या नोटांसारख्याच दिसत असल्याने अनेकांची फसवणूक होते.

अनेकांना बनावट नोटा कशा ओळखायच्या, याबाबत काहीही माहिती नसते.. शिवाय, त्यासाठी आवश्यक जनजागृतीही केली जात नाही. अशा वेळी तुम्ही ‘टेक्नॉलॉजी’ची मदत घेऊ शकता. तुम्ही सतत मोठ्या प्रमाणात रोकड बाळगत असाल, तर तुमची फसवणूक होऊ शकते. अशा वेळी खोट्या नोटा तपासण्यासाठी तुम्हाला मोबाईल अ‍ॅप्सची (apps) मदत होऊ शकते..

Advertisement

हे ‘अ‍ॅप्स’ ओळखतात बनावट नोटा..

आयएनआर फेक नोट चेक गाईड (INR Fake Note Check Guide)
‘अँड्रॉइड युजर्स’ ‘प्ले स्टोअर’वरून हे ‘अ‍ॅप’ सहज ‘डाउनलोड’ करू शकतात. हे एक मार्गदर्शक अ‍ॅप आहे. बनावट नोटांविषयी जनजागृती करण्यासाठी हे अ‍ॅप तयार केलंय. कोणत्याही नोटेचा फोटो या ‘अ‍ॅप’वर अपलोड करताच, ती नोट खरी की खोटी, याची माहिती हे ‘अ‍ॅप’ देतं.. खोट्या व खऱ्या नोटांबाबतची माहिती ‘नोटिफिकेशन्स’द्वारे युजर्संना दिली जाते.

Advertisement

काऊंटरफेईट मनी डिटेक्टर (Counterfeit Money Detector)
भारतच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशांच्या बनावट नोटा हे ‘अ‍ॅप’ ओळखते.. या ‘अ‍ॅप’मधून भारतासह जगातील अनेक देशांच्या नोटांची माहिती मिळते. तुम्ही जर परकीय चलनाचा वापर करीत असाल, तर हे ‘अ‍ॅप’ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकते.

चकफेक अ‍ॅप (Chkfake App)
कोणतीही नोटेचा फोटो या ‘अ‍ॅप’वर ‘अपलोड’ केला की ‘अ‍ॅप’च्या साहाय्याने त्या नोटेची सगळी माहिती मिळते. त्यामुळे बनावट व खऱ्या नोटांमधील फरक लगेच समोर येतो.. हे अ‍ॅप ‘iOS’ आणि ‘Android’ दोन्ही युजर्ससाठी ‘प्ले स्टोअर’वरही उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement