SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

केंद्राच्या ‘या’ निर्णयामुळे एका ठिकाणी समजणार सगळ्या योजना, नागरिकांचा होणार ‘असा’ फायदा..!

सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. विविध मंत्रालयाद्वारे वेगवेगळ्या सरकारी योजना राबवल्या जातात. मात्र, अनेकदा लाभार्थ्यांना या याेजनांची माहितीच मिळत नाही.. परिणामी, काही ठराविक लोकच या योजनांचा लाभ घेतात व खरे लाभार्थी योजनांपासून वंचितच राहतात.. योजनांचा उद्देश पूर्ण होत नाही..

केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या याेजनांची लाभार्थ्यांना माहिती व्हावी, यासाठी विविध योजना आता एकाच व्यासपीठावर आणल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकार ‘जनसमर्थ’ नावाने एक पोर्टल सुरु करणार आहे. या पोर्टलमुळे सामान्यांचे जीवन सुसह्य होईल, विशेषत: शेतकऱ्यांना या पोर्टलचा लाभ होईल, असे सांगितले जाते..

Advertisement

मोदी सरकारचे ‘किमान सरकार, कमाल प्रशासन’ असं व्हिजन आहे. त्या अनुषंगाने या ‘जनसमर्थ’ पोर्टलवर सुरुवातीला 15 सरकारी कर्जाबाबतच्या योजनांचा समावेश केला जाणार आहे. त्यानंतर हळूहळू या पोर्टलचा विस्तार केला जाणार आहे.. अर्थात हा विस्तार पोर्टलच्या (portal) कामकाजावर आधारित असेल..

केंद्र सरकारच्या काही योजनांमध्ये अनेक एजन्सींचा वाटा आहे. त्यामुळे हळूहळू या पोर्टलचा विस्तार केला जाणार आहे. उदा. प्रधानमंत्री आवास योजना, क्रेडिट लिंक्ड कॅपिटल सबसिडी स्कीम (सीएलसीएस) सारख्या योजना वेगवेगळ्या मंत्रालयांद्वारे चालवल्या जातात. अशा साऱ्या सरकारी योजना एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हाव्यात, जेणेकरून सामान्यांना कोणत्याही अडचणीशिवाय त्या सहज माहिती होतील, असा या पोर्टलचा उद्देश आहे.

Advertisement

पोर्टलची पायलट ट्रायल सुरु
सध्या ‘भारतीय स्टेट बँक’ (एसबीआय) व इतर ‘लेंडर्स’द्वारे या पोर्टलची ‘पायलट ट्रायल’ सुरू आहे.. पोर्टलमधील त्रुटी दूर केल्या जात आहेत. त्यानंतर सर्वसामान्यांसाठी हे पोर्टल सुरू केले जाणार आहे.

‘जनसमर्थ’ पोर्टलमध्ये एक ओपन आर्किटेक्चर असेल, जेणेकरून भविष्यात राज्य सरकारे व इतर संस्थांनाही या व्यासपीठावर त्यांच्या योजनांचा समावेश करता येणार आहे. त्यामुळे केंद्रासह राज्यांच्याही योजनांची माहिती या पोर्टलद्वारे नागरिकांना समजू शकेल..

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकारने 2018 मध्ये विविध कर्ज योजनांसाठी http://psbloansin59minutes.com हे पोर्टल सुरू केले होते. त्यावर एमएसएमई (MSME), गृहकर्ज (home loan), वाहन आणि वैयक्तिक कर्जांचा समावेश आहे. या पोर्टलवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून 59 मिनिटांत कर्ज मंजूर केले जाते.. पूर्वी त्यासाठी 20 ते 25 दिवस लागत.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement