‘आयपीएल’च्या (IPL-2022) 15व्या पर्वाचा समारोप आज (रविवारी) होत आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर ‘गुजरात टायटन्स’ विरुद्ध ‘राजस्थान राॅयल्स’ या संघांमध्ये ‘मेगा फायनल’ रंगणार आहे.
दिवंगत खेळाडू शेन वाॅर्नच्या नेतृत्वाखाली 2008 मध्ये पहिले-वहिले विजेतेपद मिळवणारा ‘राजस्थान’चा संघ पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करणार की फायनलमध्ये कधीही हार न पाहणारा हार्दिक पांड्याचा ‘गुजरात’ संघ बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेस पोहचली आहे.
यंदाच्या ‘आयपीएल’च्या लिग मॅचमध्ये दोन्ही लढतीत ‘गुजरात’ने विजय मिळवल्याने त्यांचे पारडे जड दिसते, परंतु गेल्या दोन सामन्यातील फॉर्म पाहता, ‘राजस्थान’च्या संघालाही कमी लेखता येणार नाही. यंदाची ‘आयपीएल ट्राॅफी’ कोण उचलतो, हे अवघ्या काही तासांत समजणार आहे..
जगातील कोणत्याही टी-20 लिगपेक्षा ‘आयपीएल’च्या विजेत्या-उपविजेत्याला मिळणारी बक्षिसाची रक्कम तीन पट अधिक आहे. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये कोणत्या संघाला, तसेच खेळाडूंना किती रकमेची बक्षिसे मिळणार आहेत, तसेच जगभरातील कोणत्या लिगमध्ये विजेत्याला किती बक्षिस मिळते, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
‘आयपीएल’मधील बक्षिसांची रक्कम
- आयपीएल विजेता संघ- 20 कोटी रुपये
- आयपीएल उपविजेता संघ- 13 कोटी रुपये
- तिसऱ्या क्रमांकावरील संघ- 7 कोटी रुपये (आरसीबी)
- चौथ्या क्रमांकावरील संघ- 6.5 कोटी रुपये (लखनऊ)
इतर बक्षिसे अशी
पर्पल कॅप विजेता | 15 लाख |
ऑरेंज कॅप विजेता | 15 लाख |
सुपर स्ट्राईकर | 15 लाख |
Crack it sixes of the season | 12 लाख |
पॉवर प्लेयर | 12 लाख |
मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर | 12 लाख |
गेम चेंजर | 12 लाख |
इमर्जिंग प्लेयर | 20 लाख |
परफेक्ट कॅच ऑफ द सीजन | 12 लाख |
सामनावीर (फायनल) | 5 लाख |
2008 पासून विजेत्या संघाला मिळालेली रक्कम
आयपीएल- 2008 – 4.8 कोटी
आयपीएल – 2009 – 6 कोटी
आयपीएल- 2010 – 8 कोटी
आयपीएल – 2011 – 10 कोटी
आयपीएल – 2012 – 10 कोटी
आयपीएल -2013 – 10 कोटी
आयपीएल – 2014 – 15 कोटी
आयपीएल – 2015 – 15 कोटी
आयपीएल – 2016 – 20 कोटी
आयपीएल – 2017 – 15 कोटी
आयपीएल – 2018 – 20 कोटी
आयपीएल – 2019 – 20 कोटी
आयपीएल – 2020 – 10 कोटी
आयपीएल – 2021 – 20 कोटी
जगातील लिगमध्ये विजेत्याला मिळणारी रक्कम
- आयपीएल- 20 कोटी
- कॅरेबियन प्रीमियर लीग- 7.5 कोटी
- बांग्लादेश प्रीमियर लीग- 6.34 कोटी
- पाकिस्तान सुपर लीग- 3.73 कोटी
- बिग बॅश लीग- 3.35 कोटी
- द हंड्रेड लीग – 1.51 कोटी
- लंका प्रीमियर लीग – 73.7 लाख