Income Tax – इनकम टॅक्सचे नियम बदलले! कोणताही व्यवहार करण्यापूर्वी ‘या’ बाबी जाणून घ्याच
Income Tax प्राप्तिकर (15 वी सुधारणा) नियम, Income Tax 2022 अंतर्गत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन नियम जारी केले आहेत, जे 26 मे २०२२ पासून लागू झाले आहेत.
स्प्रेडइट न्यूज
मुंबई – Income Tax – Pan-aadhar Mandatory – इनकम टॅक्सशी संबंधित महत्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही देखील पोस्ट ऑफिसशी संबंधित मोठे व्यवहार करत असाल तर ही माहिती तुम्हाला उपयोगी पडेल. उद्यापासून आयकर विभागातील महत्वाचे नियम बदलत आहेत. नवीन लागू झालेल्या नियमांनुसार, एखाद्या व्यक्तीने कोणत्याही एका आर्थिक वर्षात बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रोख जमा केल्यास, त्याला पॅन आणि आधार कार्ड जमा करणे अनिवार्य राहणार आहे.
Income Tax प्राप्तिकर (15 वी सुधारणा) नियम, Income Tax 2022 अंतर्गत, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन नियम जारी केले आहेत, जे 26 मे २०२२ पासून लागू झाले आहेत.
महत्वाचं म्हणजे, एका आर्थिक वर्षात बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील कोणत्याही एक किंवा अधिक खात्यांमधून 20 लाख रुपये काढण्यासाठी देखील पॅन-आधार लिंक करणे आवश्यक असेल. जर एखाद्याने एका आर्थिक वर्षात एक किंवा अधिक खात्यांमध्ये 20 लाख रुपये रोख जमा केले तर त्याला पॅन-आधार सबमिट करावा लागेल.
तुम्ही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये चालू खाते किंवा कॅश क्रेडिट खाते उघडले तरीही पॅन-आधार द्यावा लागेल. जर एखाद्याने चालू खाते उघडले तर त्यासाठीही पॅन कार्ड अनिवार्य असेल. एखाद्याचे बँक खाते आधीच पॅनशी जोडलेले असेल, तर तरीही त्याला व्यवहारांसाठी पॅन-आधार लिंक करावे लागेल.
रोख रकमेच्या चोऱ्याना आला बसावा तसेच देखरेख करता यावी हा यामागचा प्रमुख उद्देश आहे. याच उद्देशाने आयकर विभागाने (Income Tax)हा निर्णय घेतला आहे. आयकर विभागाला लोकांच्या आर्थिक व्यवहारांची (Financial) माहिती राहावी यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. आता आधार आणि पॅन जोडल्यामुळे अधिकाधिक लोक आयकराच्या कक्षेत येतील. व्यवहारादरम्यान पॅन क्रमांक असल्यास, आयकर विभाग तुमच्यावर बारीक नजर ठेवेल.