SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेला येणार 2000 रुपये, ‘पीएम किसान योजने’साठी 21 हजार कोटींची तरतूद..!

पंतप्रधान किसान सन्मान योजना.. मोदी सरकारची महत्वाकांक्षी योजना.. शेतकऱ्यांना या योजनेतून दरवर्षी 6 हजार रुपये केंद्र सरकारतर्फे देण्यात येतात.. आतापर्यंत या योजनेचे 10 हप्ते झाले आहेत. 1 जानेवारी 2022 रोजी पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojna) दहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता.

गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांना या योजनेच्या 11 व्या हप्त्याचे वेध लागले होते. अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून, केंद्र सरकारने 11 व्या हप्त्याची तारिख जाहीर केली आहे. त्यानुसार, येत्या 31 मे रोजी या योजनेच्या 11 व्या हप्त्याचे 2 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे संकेत केंद्रीय कृषीमंत्र्याच्या कार्यालयातून देण्यात आले आहेत.

Advertisement

शिमला (हिमाचल प्रदेश) येथे ‘गरीब कल्याण संमेलन’ होणार आहे. या कार्यक्रमातच देशातील सुमारे 10 कोटी 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 2 हजार रुपये वर्ग केले जाणार आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने 21 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे..

दरम्यान, शिमला येथे आयोजित ‘गरीब कल्याण संमेलना’तून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे 9 केंद्रीय मंत्रालयांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 16 योजनांच्या अनुशंगाने लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. या योजनांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले..

Advertisement

दरम्यान, पीएम किसान योजनेचा 10 वा हप्ता जानेवारीत जमा झाल्यानंतर, शेतकऱ्यांना 11 व्या हप्त्याचे वेध लागले होते. मागील एप्रिल महिन्यातच 11 वा हप्ता जमा होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, आता त्याची प्रतीक्षा संपली आहे. या हप्त्याची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ‘ई-केवायसी’ करावे लागणार असून, त्यासाठी फक्त दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.

असा चेक करा निधी
मोदी सरकार 31 मे रोजी पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करणार आहे.. हे पैसे खात्यावर वर्ग झाले की नाही, याची माहिती चेक करता येते. त्यासाठी या योजनेच्या संकेतस्थळावर pmkisan.gov.in जावे.. तेथे ‘Farmer Corner’वर क्लिक केल्यास दोन पर्याय समोर येतील. आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकून पैसे जमा झाले की नाही, हे तपासू शकता.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement