SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Gold news सोन्या-चांदीच्या दरात या आठवड्यात मोठी घसरण; वाचा काय आहेत ताजे दर

मुंबई : Gold Price news लग्नसराईचे दिवस असताना सोने चांदीच्या दरात मोठे बदल होत आहेत. जागतिक स्तरावर घडत असलेल्या घटनांचे परिणाम धातूंच्या दरावर होत असतात. अशातच आता आठवड्याच्या शेवटी सोने चांदीचे दर पुन्हा घसरले असल्याचे समोर आले आहे.

 

 

Advertisement
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन म्हणजेच IBJA च्या वेबसाइटनुसार, या व्यावसायिक आठवड्याच्या सुरुवातीला (23 ते 27 मे) 24-कॅरेट सोन्याचा दर 51,317 होता, जो शुक्रवारपर्यंत 51,204 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे.

 

 

Advertisement
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत Gold rate प्रति 10 ग्रॅम 47,750 रुपये आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 52,090 प्रति 10 ग्रॅम आहे. पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 47,850 असेल तर 24 कॅरेट   सोन्याचा दर 52,190 रुपये असेल. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 62,200 रुपये प्रति किलोने विकली जात आहे.