मुंबई :
केंद्र सरकार देशातील सर्वसामान्य नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवत आहे. तरुणांसाठी नवीन रोजगाराच्या संधी, वृध्द लोकांना पेन्शन, शेतकऱ्यासाठी, लहान मुलांसाठी देखील विविध योजना सरकारच्या माध्यमातून चालू आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी अनेक योजना या गुंतवणुकीचे चांगले पर्याय आहेत. त्यांच्या चांगल्या परतव्यामुळे या योजना सामान्य जनतेत खूप लोकप्रिय झालेल्या आहेत. अशाच काही योजना देशातील महिला व मुलींसाठी आहे. यातील एक महत्वाची योजना म्हणजे सुकन्या योजना होय.
Advertisement
घरातील कन्यारत्नासाठी विशेष असलेली योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना होय. आता मुलीच्या जन्माचे स्वागत आणि कौतुक या योजने मार्फत सरकार स्वतः करते. मुलीच्या पालकांसाठी 2015 मध्ये सुकन्या समृद्धी योजना सुरु केली होती. या योजनेचा उद्देश पालकांना त्यांच्या मुलीच्या शिक्षणासाठी पैसे उभारण्यासाठी प्रोत्साहित करणे आहे. शिक्षण आणि शालेय शिक्षणासोबतच मुलीच्या लग्नाचा खर्चही होतो. याच गोष्टींचा विचार करून ही योजना केंद्र सरकारने सुरू केली होती. परंतु या योजनेच्या नियमात नुकतेच सरकारने काही महत्वाचे बदल केले आहेत. ते आपण जाणून घेऊयात.
Advertisement
सुकन्या समृद्धी योजना खाते मुलगी जन्माला आल्यानंतर ती 10 वर्षांची होईपर्यंत 250 रुपये ठेवीसह उघडता येते. सध्या ही योजना 7.6 टक्के व्याजदर देत आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडल्याच्या तारखेपासून 21 वर्षे किंवा मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत आणि लग्न होईपर्यंत सक्रिय राहील. तसेच जर संबंधित व्यक्ती पुरावा देऊ शकत नसेल तर त्यांना पोस्ट ऑफिस किंवा बँकेत 100 रुपये शुल्क भरावे लागेल जिथे हस्तांतरण केले जाईल.
Advertisement
सुकन्या समृद्धी योजनेतील बदललेले 5 नियम :-
- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खात्यात वार्षिक किमान 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख जमा करण्याची तरतूद आहे. खाते किमान रकमेवर डीफॉल्ट आहे. नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा सक्रिय न केल्यास, मॅच्युरिटी होईपर्यंत खात्यात जमा केलेल्या रकमेवर लागू दराने व्याज दिले जाईल.
- सुकन्या समृद्धी योजनेचे खाते मुलीच्या मृत्यूनंतर किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास बंद केले जाऊ शकते. मात्र आता पालकाचा मृत्यू झाल्यास खाते मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते.
- नियमांमध्ये बदल केल्यानंतर खात्यातील चुकीचे व्याज परत करण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय, प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्याचे वार्षिक व्याज जमा केले जाईल.
- पूर्वीच्या नियमांनुसार, मुलगी 10 वर्षांची असताना खाते चालवू शकते. पण आता मुलींना 18 वर्षापूर्वी खाते चालवण्याची परवानगी नाही. पालक किंवा संरक्षक 18 वर्षे वयापर्यंत खाते चालवतील.
- केंद्र सरकारच्या या योजनेत 80सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ पूर्वी फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होता. आता एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली असतील तर त्या दोघांसाठीही खाते उडण्याची तरतूद आहे. म्हणजेच तुम्ही एकाच वेळी तीन मुलींच्या नावावर पैसे जमा करू शकता.
Advertisement