SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

शालेय साहित्यासाठी पालकांचा खिसा होणार खाली, ‘अशी’ झालीय दरात वाढ..!

गेली दोन वर्षे महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे सारंच ठप्प झालं होतं.. मुलांच्या शिक्षणाबाबतही टंगळ-मंगळ सुरु होती. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालाय. सारं काही सुरळीत झालंय.. त्यामुळे यंदा ‘ऑनलाईन’ शिक्षणाला ‘बाय बाय’ करुन ‘ऑफलाईन’ शिक्षण सुरु होणार, हे निश्चित..!

जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. गेली 2 वर्षे शाळा बंद असल्याने शालेय वस्तूही खरेदी करण्याची वेळ आली नाही. मात्र, यंदा मुलांसाठी सारं काही नव्याने घ्यावं लागणार असून, शालेय खरेदी करताना पालकाची चांगलीच दमछाक होणार आहे.

Advertisement

शालेय साहित्याला महागाईच्या झळा बसल्या आहेत. कच्च्या कागदाच्या मालाचे भाव वाढल्याने शिक्षण साहित्याच्या किंमतीत यंदा 30 ते 40 टक्के वाढ झाली आहे. बाजारात नवीन नोटबुकसह शैक्षणिक साहित्य दाखल झालं असलं, तरी ते खरेदी करताना पालकांचा खिसा खाली होणार, हे नक्की..!

शालेय साहित्याचे नवे दर (डझनानुसार)

Advertisement
  • 100 पेजेस वह्या : 132 ते 216 रुपये
  • 200 पेजेस वह्या : 216 ते 360 रुपये
  • लॉग बुक 100 पेजेस : 216 ते 300 रुपये
  • लॉग बुक 200 पेजेस : 240 ते 400 रुपये
  • ‘ए’ फोअर साईज : 300 ते 800 रुपये
  • कंपासपेटी : 50 पासून ते 300 रुपयांपर्यंत

दरम्यान, ग्रामीण भागातील आठवडे बाजारांमध्येही शालेय साहित्याची विक्री सुरु झाली आहे. त्यात नोटबुक, कंपासपेटी, नोट पॅड, पाटी, पेन, दप्तर, अंकलिपी या वस्तूंना मोठी मागणी असल्याचे व्यापारी सांगतात. शाळेत पुस्तके मोफत मिळणार असली, तरी वह्यांची खरेदी केली जात आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यंदा शैक्षणिक साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने पालकांमध्ये मोठी नाराजी आहे. मुलांच्या आवडीनुसार, साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्यात अभिनेता, निसर्गरम्य चित्र, फुले, पक्षी, प्राणी, कार्टुनच्या छायाचित्रांसह बहुरंगी वह्यांना मुलांची अधिक पसंती दिसते.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement