SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘रिव्ह्यू’ पाहून ऑनलाईन शॉपिंग करता का..? फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार…

ऑनलाईन शाॅपिंग करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. ई-काॅमर्स वेबसाईटवरुन कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी, ती वस्तू कशी आहे, त्या वस्तूंबाबत इतरांचे काय म्हणणे आहे, हे जाणून घेतलं जातं.. त्यासाठी त्या वस्तूच्या खाली अन्य ग्राहकांनी लिहिलेले ‘रिव्हू’ वाचून तुम्ही खरेदीचा निर्णय घेत असाल, तर थांबा…!

तुम्हाला हे माहितीय का, की बऱ्याचदा त्या वस्तूंच्या खाली लिहिलेले ‘रिव्हू’ हे फेक असतात.. त्याद्वारे ई-काॅमर्स कंपन्या आपल्या वस्तूंबाबत चांगले ‘रिव्हू’ लिहून ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र, आता तसे होणार नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे…

Advertisement

ई-कॉमर्स पोर्टल वा वेबसाइट्सवरील ‘रिव्हू’ तपासण्यासाठी केंद्र सरकार एक फ्रेमवर्क तयार करणार आहे. त्यासाठी ग्राहक व्यवहार मंत्रालय व ‘एएससीआय’ (ASCI) मिळून एक ‘मानक ऑपरेटिंग प्रक्रिया’ (SOP) आणली जाणार आहे. सोबतच ‘ई-कॉमर्स’ वेबसाईटवर ‘फेक रिव्ह्यू’ लिहिणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी यंत्रणा तयार केली जाणार आहे.

याबाबत ‘ई-कॉमर्स’ कंपन्या आणि इतर संबंधित प्रतिनिधींसाेबत नुकतीच ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंग यांच्यासोबत बैठक झाली. त्यात ई-कॉमर्स वेबसाईटवर बनावट ‘रिव्हू’ देऊन ग्राहकांची दिशाभूल करण्याबाबत, तसेच खबरदारीच्या उपाय योजनांबाबत चर्चा करण्यात आली..

Advertisement

वस्तू खरेदी न करताच ‘रिव्हू’
युरोपियन युनियनमधील 223 प्रमुख वेबसाइट्सवरील ऑनलाइन ‘रिव्हू’ बैठकीत दाखवण्यात आले. त्यात 55 टक्के वेबसाइट्सकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले.. विशेष म्हणजे, त्यापैकी 144 वेबसाइट्सनी असे प्रकार रोखण्यासाठी काहीही प्रयत्न केलेले नाहीत. कोणतीही वस्तू खरेदी न करता, त्यावर ‘रिव्हू’ लिहिले होते.

अशा प्रकारच्या ई-कॉमर्स वेबसाईटवरील ‘फेक रिव्हू’पासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी कशी मानक ऑपरेटिंग तत्त्वे तयार केली जाऊ शकतात, यावर विचार सुरु आहे. बैठकीसाठी उपस्थित प्रतिनिधींना याबाबत सल्ले देण्यास सांगण्यात आले असून, त्याआधारे ग्राहकांसाठी मंत्रालय एक ‘एसओपी’ तयार करणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement