SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

अरे वा! आंब्याच्या सीझनमध्ये आंबा खाताय; पण प्रमाणापेक्षा जास्त खाल्ला तर…

खरं तर फळ खाणं हे आरोग्यासाठी अतिशय उत्तम. आणि ज्या त्या हंगामातील फळे तर खाल्लीच जायला हवी. उन्हाळा म्हटलं की, आपोआप डोळ्यासमोर आंबा येतो. आंब्याला फळांचा राजा असे म्हणतात. लहान लेकरांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत असा सगळ्याच वयोगटातील लोकांच्या आवडीचे हे फळ आहे. शक्यतो कुणी अस सापडतच नाही, की ज्याला आंबा आवडत नाही. आंबा नुसता चवीलाच गोड नाही तर, त्याच्यात आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे ए, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी  आणि भरपूर प्रमाणात फायबर आहेत. याशिवाय प्रथिने, कार्बोहायड्रेट, फॅट्स आणि पोटॅशियम सुध्दा असते. म्हणजे नकळत आंबा खाल्ल्यानंतर आपल्या शरीरात हे सर्व घटक जात असतात.

 

त्या तुलनेत आंब्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि सोडियमचे प्रमाण खूप कमी असते, त्यामुळे ते एक सुपरफ्रुट म्हणून ओळखले जाते.

 

Advertisement
आजवर त्याचे वैज्ञानिक गुणधर्म आपल्याला माहितीदेखील नव्हते. आपण फक्त गोड चवीमुळे आंबे खातो. पण ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खायचा नसतो. अगदी त्याचप्रमाणे आंबा खाणं गरजेचे असले किंवा ते आपल्या खूप आवडीचे जरी फळ असले तरी ते प्रमाणात खायचे. आंब्याचे अतिरिक्त सेवन आपल्या आरोग्यास धोकादायक ठरू शकते.

 

 

Advertisement
जास्त आंबा खाण्याचे दुष्परिणाम  :-
  •  आंब्यामुळे शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पिंपल्सची शक्यता.
  •  कच्चा आंबा जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे गॅस किंवा पोटदुखीचा त्रास.
  •  जास्त प्रमाणात आंबा खाल्याने पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास.
  •  काही लोकांना आंब्याच्या अतिसेवनामुळे अ‍ॅलर्जी किंवा घसा खवखवण्याची समस्या.
  •  ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.
  •  गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आंब्याचे सेवन करावे.
  •  प्रमाणापेक्षा जास्त आंबे खाल्ल्याने वजन वाढणे आणि मधुमेह ची संभावना.
  •  कच्चा आंबा खाल्ल्यानंतर दूध पिणे टाळावे. कारण आयुर्वेदानुसार हे मिश्रण योग्य नाही.
  •  रासायनिक पद्धतीने पिकवलेले आंबे शरीरास ते अपायकारक.

 

आंबा हे एक उष्ण फळ असून त्याचे प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यास हानिकारक ठरत नाही. परंतु अतिरिक्त प्रमाण झाल्यास शरीरातील उष्णता, साखरेची पातळी वाढणे, त्वचेवर अलर्जी अशा आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते. खरं तर आंबा खाण्यापूर्वी तो किमान 1 तास पाण्यात भिजवून ठेवावा. जेणेकरून त्यातील उष्णता बाहेर पडते. दिवसात जास्तीत जास्त 2 आंबे खाणे योग्य आहे. खरं तर आंबा खाण्याची योग्य वेळ ही सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्याची वेळ ही आहे. कारण यावेळी आंबा खाल्ल्याने शरीरात दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. आंबा आपल्या शरीरातील क्षार भरून काढतो आणि दिवसभर आपल्याला उत्साही राहण्यास मदत करतो. त्यामुळे आजपासुन आपल्या आवडीचा आंबा खायचा पण अगदी प्रमाणात आणि योग्य वेळेत.
Advertisement