व्हॉट्सअॅप म्हणजे आपल्यासारख्या स्मार्टफोनधारी लोकांसाठी संभाषण करून आभासी जवळीक वाढवण्याचं महत्वाचं साधन आहे. आजकाल जगातील अनेक देशांत व्हॉट्सअॅप वापरलं जातं. यामुळे Whatsapp नवनवीन फीचर्स आणून युजर्सना वेगवेगळे खास अनुभव देण्यास नेहमीच मदत करत असते.
आपण व्हॉट्सअॅप द्वारे फोटो, ऑडिओ-व्हिडीओ, कॉन्टॅक्ट्स, डॉक्यूमेंट्स व इतर बऱ्याच फाईल्स इतरांना पाठवू शकतो. पण कधीकधी असं वाटत असेल ना की आपण सेंड केलेल्या फाईल्स कितपत सुरक्षित असतील, तर त्यासाठी व्हॉट्सअॅपने Message Disappeared नावाचं फिचर आणलं होतं. आता व्हॉट्सअॅपने आपल्या Whatsapp Privacy Policy मध्ये महत्वाचे बदल केले आहेत. त्यांनी यूजर्ससाठी खास फिचर आणायची तयारी चालू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फीचर युजर्सना डीसअॅपिअर मेसेज फोनमध्ये सेव्ह करण्याची सुविधा देईल. विशेषत: युजर्सच्या मेसेजची प्रायव्हसी वाढवण्यासाठी आणि त्यांना अधिक सुरक्षित करण्यासाठी कंपनीने हे फीचर जारी केले होते. पण, कंपनी आता या फीचरला नवा ट्विस्ट देत आहे, ज्यामुळे डीसअॅपिअर झालेले मेसेज फोनमध्ये सेव्ह होत नाहीत. त्यामुळे त्यांना डीसअॅपिअर्ड मेसेज असे नाव देण्यात आले आहे. माहितीनुसार, या फीचरला ‘कीप मेसेज’ असे नाव देऊ शकते. ज्यावर व्हॉट्सअॅप सध्या काम करत आहे.
व्हॉट्सअॅप फीचर ट्रॅकरने एक स्क्रीनशॉट शेअर केला होता त्यानुसार, व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट इन्फो व ग्रुप इन्फोमध्ये एक नवीन विभाग सादर करण्याचा प्लॅन आखत आहे, जे सर्व सेव्ह मेसेजची यादी करू शकेल. व्हॉट्सअॅप यूजर्स जेव्हा हा मोड ऑन करतील तेव्हाच ते मेसेज सेव्ह होणार आहेत. अन्यथा डीसअॅपिअर झालेले मेसेजसुद्धा त्यांच्या निर्धारीत मोडनुसार 7 दिवस किंवा 24 तासांनंतर डीसअॅपिअर होतील. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की चॅटमध्ये संबंधित व्यक्ती ते मेसेज अन-सेव्ह करु शकतात, त्यामुळे व्हॉट्सअॅप आता ते मेसेज सर्च करण्याचा सोपा मार्ग शोधत आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy