भारतीय लोक खरेदी करायचं म्हटलं की आवडीनंतर दुसरा विचार करतात तो आपल्या बजेटचा. देशात मध्यमवर्गीय लोकांची संख्या जास्त असल्याने ‘बजेट’ असलं की सगळं काही खरेदी करणे शक्य अशी धारणाच म्हणायची. असंच आता आजमितीला दुचाकीसोबतच लोक कार जास्त वापरायला लागले आहेत. तर काहींचं कार घेण्याचं स्वप्नं देखील असतं.
तुम्हालाही वाटत असेल की कार क्षेत्रात कमी बजेटमध्ये एखादी उत्तम फिचर्ससह खिशाला परवडणारी कार आपल्याकडे असावी. तर आज आम्ही तुम्हाला हॅचबॅक सेगमेंटमध्ये उपस्थित असलेल्या मायलेज कारमध्ये आम्ही सर्वाधिक विक्री होणारी कार मारुती वॅगनआरबद्दल सांगणार आहोत, बघा कमी किंमतीत असून तुमच्या बजेटमध्ये ही कार बसतेय का..
आपण आपल्या नजीकच्या शोरूममधून जर मारुती वॅगनआर (Maruti Wagon-R) खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला 5.47 लाख ते 7.20 लाख रुपये मोजावे लागतील. पण आम्ही सुचवलेल्या व ऑनलाईन उपलब्ध असलेल्या काही ऑफरनुसार तुम्ही ही कार नवीन कारच्या निम्म्यापेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहात.
मारुती वॅगनआर वर उपलब्ध असलेल्या या ऑफर वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून सेकंड हँड वाहन ऑनलाइन खरेदी करण्यासाठी आम्ही गोळा करून तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत.
सर्वात पहिली ऑफर CARDEKHO वेबसाइटवर आहे. जिथे या मारुती WagonR चे 2010 मधील मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध असून कारची किंमत 1.55 लाख रुपये ठेवण्यात आलीय.
त्यानंतर दुसरी ऑफर म्हणजे CARWALE वेबसाईटवर आहे. त्या ऑफरनुसार या Maruti WagonR च्या 2012 चे मॉडेल ज्याची किंमत 1.6 लाख रुपये असून कारसोबत कोणतीही ऑफर किंवा प्लॅन मिळणार नाही.
मारुती वॅगनआर कारच्या फिचर्सबद्दल थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, इंजिन 637 PS पॉवर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास मदत करते. हे इंजिन 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी कनेक्ट आहे. मायलेजबद्दल, कंपनीने दावा केलाय की मारुती WagonR पेट्रोलवर 24.35 kmpl आणि CNG वर 34.05 kmpl मायलेज देते. यात हे थोडेफार कमी जरी झाले तरी इतर चांगल्या कारपेक्षा ही कार परवडू शकते. फक्त लक्षात ठेवा की, ऑफरनुसार किंमतीत काहीसा बदल होऊ शकतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy