SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रेल्वेने सुरु केली ‘ही’ भन्नाट सेवा..! प्रवाशांचा होणार मोठा फायदा…!

सतत रेल्वे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. बऱ्याचदा रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी रेल्वे स्टेशनवर नागरिकांना तास न् तास ताटकळत उभे राहावे लागते.. लांबच लांब रांगांमुळे अनेकदा प्रवाशांची ट्रेनही चुकल्या आहेत. मात्र, आता या साऱ्या त्रासातून प्रवाशांची सुटका होणार आहे. कारण, रेल्वेने प्रवासी तिकिट काढण्यासाठी खास सुविधा सुरु केली आहे..

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सहज तिकीट मिळावे, यासाठी रेल्वेकडून ‘ऑटोमॅट‍िक तिकीट वेंड‍िंग मशीन’ (ATVM)ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकिट काढण्यासाठी लांबच्या लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही.

Advertisement

विशेष म्हणजे, या मशीनवर प्रवाशांना रेल्वे तिकिटासह प्लॅटफॉर्म तिकीट व मासिक पास मिळणार आहे. त्यासाठी तेथे डिजिटल पेमेंटची सोय करण्यात आली आहे. प्रवाशांची गर्दी असणाऱ्या रेल्वे स्थानकांमध्ये ‘एटीव्हीएम’ (ATVM), यूपीआय व क्यूआर कोडची सोय करण्यात आली आहे. त्याद्वारे प्रवाशांना ‘एटीव्हीएम’ (ATVM) स्मार्टकार्डही रिचार्ज करता येणार आहे.

‘एटीव्हीएम’ मशीनमुळे रेल्वे प्रवाशांना तातडीने तिकिट मिळणार असून, त्यांचा त्रास कमी होणार आहे. शिवाय डिजिटल पेमेंट पद्धती असल्याने नागरिकांचा वेळही वाचणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Advertisement

मशीन कसे काम करते..?
‘ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन’ हे अगदी ‘एटीएम’प्रमाणे काम करते.. मशीनचा वापर आधी फक्त लोकल किंवा प्लॅटफॉर्म तिकीट काढण्यासाठी होत होता. मात्र, आता या मशीनवर लांबच्या प्रवासाचीही तिकीटे काढता येणार आहेत. प्रवाशांना तिकिटासाठी QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर UPI द्वारे पैसे अदा करुन तिकिट काढता येणार आहे.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement