SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आपण पण ऍपल वॉच वापरताय… रेड अलर्ट

मुंबई :

ऍपल वॉच हे यंग युथचे आजवरचे सगळ्यात मोठे आकर्षण आहे. यंग जनरेशनच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास हे वॉच असणं म्हणजे Cool असल्याचं लक्षण मानलं जातं.
ऍपल वॉच स्टायलिश डिझाइन आणि उत्कृष्ट वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. या वॉचमुळे काही नुकसान झाल्याचं आजवर आपण काही ऐकलं नव्हतं. पण नुकतीच एक बातमी समोर येत आहे की, ऍपल वॉच मुळे एक महिला कंगाल झाली आहे. तीच तब्बल 31 लाखांच नुकसान झालं आहे.

काही दिवसांपूर्वी ही महिला फिरायला गेली होती.
फ्लोरिडा येथील डिस्ने वर्ल्ड येथे एका राइड दरम्यान तिचे ऍपल वॉच हरवले. महिलेच्या दाव्यानुसार हे घड्याळ 1300 डॉलरचं होतं. या घड्याळासोबत महिलेचे अनेक क्रेडिट कार्डदेखील लिंक होते. यापैकी एक क्रेडिट कार्ड अमेरिकन एक्सप्रेसचे होते, ज्याची क्रेडिट लिमिट अनलिमिटेड होती. वॉच हरवल्यानंतर काही तासांतच तिची 40 हजार डॉलर खात्यातून गायब झाले. क्रेडिट कार्डच्या फसवणुकीची माहिती मिळताच महिलेने सर्व कार्ड निष्क्रिय केले. मात्र तोपर्यंत भरपूर आर्थिक नुकसान झालेले होते.

मात्र यावेळी हे घड्याळ बनवणाऱ्या Apple कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी म्हटले आहे की, वॉच मनगटातून काढून टाकल्यानंतर आपोआप लॉक होते आणि लॉक काढण्यासाठी पिन पुन्हा टाकावा लागतो. त्यानंतरच पेमेंट केले जाऊ शकते. रिपोर्टनुसार, अशा परिस्थितीत ऍपल वॉचमुळे क्रेडिट कार्ड फसवणूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे या घटनेची सत्यता पडताळून शहानिशा सुरू आहे. परंतु त्यापूर्वी सर्व ऍपल वॉच धारकांनी सजग राहून काळजी घेणे योग्य ठरेल.

Advertisement