SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

फक्त 749 रुपयात बुक करा इलेक्ट्रिक स्कूटर; एका चार्जमध्ये चालते तब्बल 115 किलोमीटर

मुंबई :

अलीकडे वाढलेले इंधनाचे भाव आणि वाहनांच्या किमती लक्षात घेता इलेक्ट्रिक स्कूटर हा बेस्ट पर्याय आहे. सध्या तर बाजारात दर आठवड्याला नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर स्पेशल फीचर सोबत बाजारात येत आहेत. कमीत कमी किंमतीत जास्तीत जास्त किलोमीटर धावणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याची स्पर्धा कंपन्यांमध्ये सुरू झाली आहे. याचा फायदा ग्राहकांनाही मोठ्या प्रमाणात होत आहे.

Advertisement

भारतीय बाजारात iVOOMi कंपनीच्या iVOOMi एनर्जी या इलेक्ट्रिक वाहन विभागने नुकत्याच नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सादर केल्या आहेत. ज्यामध्ये कंपनीच्या iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर आणि Jeet सीरीजमधील इलेक्ट्रिक स्कूटरचा समावेश आहे. iVOOMi Jeet ची विक्री आधीच सुरू झाली आहे. नवीन S1 ची टेस्ट राईड 28 मे 2022 पासून सुरू होईल. त्यानंतर या स्कूटरची अधिकृत डिलीव्हरी पुढील महिन्यात केली जाणार आहे.

iVOOMi एनर्जीने अलीकडेच त्यांची S1 इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात 84,999 रुपये (एक्स-शोरूम) किंमतीला लौंच केली आहे. आता कंपनीने iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकिंग्स घेण्यास सुरुवात केली आहे. ग्राहकाला फक्त 749 रुपयांची टोकन अमाऊंट भरून ही स्कूटर बुक करता येणार आहे.

Advertisement

iVOOMi कंपनीने जाहीर केले आहे की, २८ मेपासून नागपूर, पुणे, मुंबई, गोंदिया, कोल्हापूर, नांदेड, इचलकरंजी, सुरत, अहमदनगर, भावनगर कच्छ आणि आटिपर या 12 शहरांमधील त्यांच्या डीलरशिपवर उपलब्ध असेल. तर भारतातल्या उर्वरित डीलरशिपवर ही स्कूटर 5 जूनपर्यंत उपलब्ध आहे.

iVOOMi S1 इलेक्ट्रिक स्कूटर 2kWh लिथियम-आयन बॅटरी आणि 60V इलेक्ट्रिक मोटरसह सुसज्ज आहे. ही स्कूटर 65 किमी प्रतितास  वेगाने धावते. तसेच एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 115 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटरची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 3 ते 4 तास लागत असून स्कूटरचं वजन 75 किलो आहे.

Advertisement