SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मान्सूनच्या प्रवेशाची IMD कडून नवीन डेटलाइन; जाणून घ्या, नेमका कधी बरसणार

मुंबई : 

नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मान्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत 99 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने 14 एप्रिल रोजी जाहीर केला होता. त्यानंतर हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी स्पष्ट केले की, देशात 27 मे रोजी म्हणजे चार दिवस अगोदर मान्सूनचा प्रवेश होणार आहे. दरम्यान आता अजून एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

Advertisement

मान्सून 1 जूनपर्यंत कधीही पोहोचू शकतो आणि परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. पुढील 48 तासांत अरबी समुद्र, संपूर्ण मालदीव आणि लक्षद्वीप भागात मान्सूनच्या आणखी काही भागांमध्ये पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. या आठवड्यात मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल होण्याची शक्यता आहे.

भारतात दक्षिण पश्चिम मान्सून सामान्यत: 1 जून पर्यंत केरळमध्ये पोहोचतो, 10 जून पर्यंत संपूर्ण दक्षिण भारताला भिजवत मुंबई पर्यंत पोहोचतो, 15 जून पर्यंत रायपूर तसेच पटना पर्यंत मान्सून पोहचून जातो आणि 1 जुलै पर्यंत दिल्ली आणि 15 जुलै पर्यंत संपूर्ण भारतभर मान्सून पावसाने ओलंचिंब करतो. मान्सूनचा हा कालावधी हवामान विभागातील नेहमीच्या सरासरीवर आधारित आहे.

Advertisement

10 ते 15 जून दरम्यान मान्सून झारखंडमध्ये दाखल होऊ शकतो. अंदमानमध्ये 17 मेपासून मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. केरळमध्ये 1 जूनपूर्वी मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच त्यांनी सांगितले आहे की, अंदमान आणि निकोबारमध्ये यंदा मान्सूनचा पाऊस नियोजित वेळेच्या सहा दिवस आधीच सुरू झाला आहे. साधारणपणे 22 मे च्या सुमारास मान्सून अंदमानमध्ये दाखल होतो. मान्सूनचा पाऊस सामान्य होईल.

Advertisement