SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

सकाळी पोट साफ होत नाहीये; ‘हे’ आहेत 6 घरगुती उपाय  

आपण बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आहारात जो बदल केला आहे, तोच शरीराला आता घातक ठरत आहे. फास्ट फूड, कोल्ड्रिंक्स याचे परिणाम आपल्याला सहजासहजी जाणवत असतात, त्यात प्रामुख्याने पोट साफ न होणे, त्यामुळे पोट दुखणे हे परिणाम जाणवतात.

 

जर तुमचे पोट साफ होत असेल तर तुम्ही ठणठणीत आहेत असा त्याचा अर्थ होतो. जर तुमचे सकाळी पोट साफ होत नसेल तर हे 6 घरघुती उपाय करा.
  • दररोज झोपण्याच्या आधी एका ग्लास कोमट पाण्याबरोबर मेथीची काही दाणे खा तुमचे पोट साफ होईल.
  • दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्यावे ज्यामुळे तुमचे पोट साफ होईल.
  • रोज सकाळी १ ग्लास कोमट पाणी प्या त्यामुळे तुमचे पोट साफ होईल.

 

Advertisement
  • आहारात हिरव्या भाज्या म्हणून पालक आणि मेथी समावेश करा.
  • रोज सकाळी उठून एक ग्लास पाण्यात थोडासा कोरफडचा रस मिसळून प्यावे.
  • दररोज रात्री दही खा यामुळे सकाळी तुमचे पोट साफ होईल.