भारतातील तरुणांना, शेतकऱ्यांना हाताला काम म्हणू फक्त शेती हवी पण आजच्या काळात व्यवसायाची जोड देखील हवी. ते कसं करता येईल तर नवयुवक आता मोठ्या प्रमाणात शेती व्यवसायाकडे (Tree Farming) वळत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून ठराविक झाडांची लागवड केल्यास आणि व्यवसायाचं रूप दिल्यास शेती पिकांत होणारे नुकसान येथे भरून निघते. जाणून घेऊ अशाच एका संधीबद्दल..
जगातील बाजारात पॉपलर ट्री फार्मिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला फायदा होतोय. पॉपलर लाकडाला खूप मागणी असल्याने ते भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्ये विकले जाते. या झाडाच्या शेतीसाठी 5 डिग्री सेल्सिअस ते 45 डिग्री सेल्सिअस दरम्यान तापमान असल्यास झाडाची वाढ चांगली होते आणि उत्पादन वाढते.
शेतकरी मित्रानो जर पॉपलर झाडाची लागवड करायची असेल तर त्यासाठी शेतजमिनीच्या मातीचा पीएच किंवा सामू 6 ते 8.5 pH दरम्यान असावा असा सल्ला कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ लोक देतात. कारण की, हे झाड जमिनीतील ओलावा सहज शोषून घेत असते. लागवड करण्याच्या आधी पॉपलरची रोपे आणल्यावर लगेचच तीन ते चार दिवसांत ती लावावीत, कारण झाडांची वाढ खुंटून उत्पादना कमी होते.
भारतातील डेहराडूनचे फॉरेस्ट रिसर्च युनिव्हर्सिटी, गोविंद वल्लभ पंत कृषी विद्यापीठ, मोदीपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल येथे रोपे मिळतील आणि सोबतच अनेक कृषी केंद्रांमधून तुम्ही त्याची रोपे खरेदी करू शकता.
आता अंदाजानुसार पाहायचं झालं तर योग्य व्यवस्थापन असल्यास जर तुम्ही एक हेक्टरमध्ये पॉपलरची लागवड केली तर 5 ते 6 लाखांपर्यंत सहज कमाई होऊ शकते. झाडांची योग्य लागवड व काळजी केल्यास एका हेक्टरमध्ये 250 झाडे असतील तर त्यांची लांबीही 80 फुटांपर्यंत वाढत जाते आणि लाकूड बाजारात 700 ते 800 रुपये प्रति क्विंटल दराने विकली जाते. या झाडाचा लॉग 2 हजारांपर्यंत सहज विकला जातो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy