SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

धुरळा उडणार! ‘या’ बैलगाडा शर्यतीत मिळणार जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर अन्..

बैलगाडा शर्यत शौकीनांसाठी मोठी व आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी फक्त तीन तासांत 2 हजाराहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोकन बूक होणारी ही आजवरची पहिली बैलगाडा शर्यत आहे. राज्यभरातून बैलगाडा मालक आता आपला जोर आजमावण्यास सज्ज झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडमध्ये होणाऱ्या शर्यतीत जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, एकशे सोळा दुचाकी आणि रोख रकमांची बक्षीस विजेत्या मालकांना दिली जाणार आहेत. तब्बल दीड कोटींच्या घरात बक्षीसांची ही रक्कम जात आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते प्रकाश जावडेकर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटलांसह अनेक दिग्गज नेते ही या शर्यतीला हजेरी लावणार आहेत.

Advertisement

पिंपरी-चिंचवडमध्ये दि. 28 ते 31 मे 2022 सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर ही शर्यत होणार आहे. हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव होणार असून, शेतकरी, बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू याठिकाणाहून बैलगाडा मालकांनी टोकन बुक केले आहे.

अठ्ठावीस लाखांचा एक जेसीबी, एक बोलेरो, अकरा लाखांचे तीन ट्रॅक्टर, साडे तीन लाखांच्या दोन बुलेट आणि 80 लाखांच्या 114 दुचाकी अशी बैलगाडा शर्यतीमधील विजेत्यांना बक्षीसं मिळणार आहेत. यासाठी बैलजोड्यांना पिंपरी चिंचवडचा बैलगाडा घाट मारावा लागणार आहे.

Advertisement

नोंदणीमुळे आजदेखील काही शर्यती होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घाट 12 सेकंदाचा आहे. त्याआधारे डिजिटल घड्याळाच्या आधारे किती सेकंदात गाडा शर्यत पूर्ण करतो याची नोंद होईल. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली असल्याचं समजलं आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement