SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट, ‘एनसीबी’चा मोठा निर्णय…!

कॉर्डिलिया क्रुझ ड्रग्ज प्रकरणात बाॅलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला मोठा दिलासा मिळाला आहे. ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’ अर्थात ‘एनसीबी’कडून आर्यन खान याच्यासह 6 जणांना ‘क्लिन चिट’ देण्यात आली आहे. आर्यनसह अविन साहू व 4 कार्यक्रम आयोजकांचा त्यात समावेश आहे..

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या काॅर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी ‘एनसीबी’कडून छापेमारी करण्यात आली होती. तत्कालिन ‘एनसीबी’ प्रमुख समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यात क्रुझवरील लाेकांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते.

Advertisement

20 जणांना अटक
या प्रकरणात सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यनचं नाव समोर आल्याने, हे प्रकरण देशभर गाजले. आर्यनसह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना या प्रकरणात अटक करण्यात आली.

आर्यन खान, अरबाज मर्चेंट, मुनमुन धमेचा, विक्रांत छोकर, मोहक जैसवाल, इशमित सिंह, गोमती चोप्रा, नूपुर सतीजा, अब्दुल कादर शेख, श्रेयस नायर, मनीष राजगरिया, अविन साहू, समीर सिंघल, मानव सिंघल,  भास्कर अरोरा, गोपाल जी. आनंद, अचित कुमार, चीनेडु इग्वे, शिवराज हरिजन, ओकोरो उजेओमा यांचा त्यात समावेश होता. नंतर बरेच दिवस आर्यनला तुरुंगातही राहावं लागलं होतं.

Advertisement

14 जणांविरुद्ध आरोपपत्र
काॅर्डिलिया ड्रग्ज प्रकरणाचा ‘एसआयटी’मार्फत तपास करण्यात आला. या तपासासाठी कोर्टानं मार्चमध्ये ‘एसआयटी’ला 60 दिवसांची मुदतवाढ दिली होती. या प्रकरणात आर्यनसह 20 जणांना अटक झाली. मात्र, आर्यनसह सहा जणांविरुद्ध सबळ पुरावे नसल्याने ‘एनसीबी’ने त्यांना ‘क्लिन चिट’ दिलीय. आर्यनकडे अंमली पदार्थ सापडले नसल्याचे ‘एनसीबी’ने स्पष्ट केले.

उर्वरित 14 आरोपींविरुद्ध एकूण 10 खंडाचे 6000 पानांचे आरोपपत्र ‘एनसीबी’ने विशेष न्यायालयात सादर करण्यात आलं आहे. ‘एनसीबी’चे डीडीजी संजय सिंह यांनी याबाबत माहिती दिली. ‘एनसीबी’कडून ‘क्लिन चिट’ मिळाल्याने आर्यनला मोठा दिलासा मिळाला आहे.

Advertisement

दरम्यान, आर्यन खानला ‘क्लीन चिट’ देण्यात आल्यानंतर याबाबत समीर वानखेडे यांना विचारणा केली असता, ते म्हणाले, की “मी आता या प्रकरणाशी संबंधित नाहीये आणि त्यावर भाष्य करू इच्छित नाही..”

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement