SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

Airtel-Voda साठी डोकेदुखी बनला Jio चा हा प्लान! 155 रुपयात मिळताहेत Unlimited Calls, Data

मुंबई :

प्रत्येक टेलिकॉम कंपनी इतर कंपन्यांपेक्षा भारी ऑफर देण्याचा प्रयत्न करत असते. जिथे आकर्षक ऑफर तिकडे ग्राहक वळत असतात. जिओ ही कंपनी तर आकर्षक ऑफर देऊन दुसऱ्या कंपन्यांचे ग्राहक खेचण्यात सगळ्यात पुढे आहे. अशातच आता जिओने एक जबरदस्त प्लान लॉन्च केला आहे, ज्यामुळे Airtel-Voda सारख्या जबरदस्त कंपन्यांची डोकेदुखी वाढली आहे.

Advertisement

जिओने नुकताच नवीन प्लान लॉन्च केला आहे. जिओ या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलचा पर्याय देत आहे. मात्र त्यासाठी एक छोटीशी अट असणार आहे. हा रिचार्ज इतर कुठल्याही App वरून करता येणार नाही. हे रिचार्ज Paytm, Phonepe, GPay च्या माध्यमातून करता येणार नाहीत. यासाठी तुम्हाला फक्त MyJio अॅप वापरावे लागेल. ही छोटीशी अट आहे.

काय आहे हा 155 रुपयाचा प्लान :-

Advertisement

या रिचार्जमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स मिळतील तसेच फक्त 2GB डेटा मिळेल. या डेटाची वैधता 28 दिवसांसाठी असेल. मात्र हा डेटा संपल्यानंतरही इंटरनेट बंद होणार नाही. तर त्याचा स्पीड 64Kbps पर्यंत कमी केला जाईल. म्हणजेच तुमचे इंटरनेट कमी स्पीडने चालू राहील. या रिचार्जमध्ये 28 दिवसांसाठी 300 एसएमएसही मिळतील.

Advertisement