नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. इंडो-तिबेटियन पोलिस दलात (Indo Tibetan Border Police) मोठी पदभरती सुरु आहे. या भरतीसाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
इंडो-तिबेटियन पोलिस दलात होणाऱ्या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
एकूण जागा – 286
या पदासाठी भरती
- हेड कॉन्स्टेबल एचसी (Head Constable HC)
- सहाय्यक उपनिरीक्षक/ स्टेनोग्राफर एएसआय (Assistant Sub-Inspector/ Stenographer ASI)
शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल एचसी (Head Constable HC)
- इच्छूक उमेदवार बारावी पास, तसेच टायपिंगचे ज्ञान असावं.
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा
सहाय्यक उपनिरीक्षक/ स्टेनोग्राफर एएसआय
- इच्छूक उमेदवार बारावी पास, तसेच स्टेनाेचे शिक्षण झालेले असावं.
- मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक
- उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असावा
वयाची अट : 1 जानेवारी 2022 रोजी 18 ते 35 वर्षे [एससी/एसटी – 5 वर्षे सूट, ओबीसी – 3 वर्षे सूट)
अशी होईल निवड..
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- लेखी परीक्षा
- कौशल्य चाचणी
- दस्तऐवज पडताळणी
- वैद्यकीय तपासणी
वेतन (Pay Scale) : 25,500 ते 81,100 /- रुपये दरमहा
अर्ज सुरू होण्याची तारीख – 8 जून 2022
अर्जासाठी शेवटची तारीख- 7 जुलै 2022
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक कराः https://recruitment.itbpolice.nic.in/
मूळ जाहीरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा