SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

वाहनमालकांच्या खिशाला कात्री, गाडीच्या ‘या’ कामासाठी लागणार जादा पैसे…!

वाहनाच्या अपघातात समोरच्या व्यक्तीचे शारीरिक वा मालमत्तेचे नुकसान झाल्यास, वाहन मालकाला त्याची भरपाई द्यावी लागते. ही भरपाई ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ अंतर्गत भरपाई दिली जाते, म्हणजेच या नुकसानीचा संपूर्ण खर्च विमा कंपनी उचलते. त्यामुळे मोटार वाहन कायद्याअंतर्गत ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’ प्रत्येक वाहनधारकासाठी खूप महत्त्वाचा असतो..

आतापर्यंत विमा नियामक ‘आयआरडीएआय’द्वारे ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’चे (third party insurance) दर निश्चित केले जात.. मात्र, यापुढे विमा नियामकाशी सल्लामसलत करून रस्ते वाहतूक मंत्रालय हे दर निश्चित करणार आहे. खरं तर केंद्र सरकार यापूर्वीच ‘थर्ड पार्टी इन्शुरन्स’चे दर वाढवण्याच्या विचारात होते. मात्र, कोरोनामुळे गेली 2 वर्षे ही दरवाढ केलेली नव्हती.

Advertisement

मात्र, रस्ते परिवहन आणि महामार्ग विभागाने वाहनांवरील ‘इन्शुरन्स’ विमा 1 जूनपासून वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दुचाकी व चारचाकी वाहनांचा ‘इन्शुरन्स’ महागणार आहे. या दराबाबत भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सूचना जारी केली आहे. पहिल्यांदाच ‘थर्ड पार्टी’ दर निश्चित करण्यात आला आहे.

अशी होणार दरवाढ

Advertisement
  • एक हजार सीसी इंजिन क्षमता असणाऱ्या खासगी वाहनांचा प्रीमियम 2072 रुपयांवरून आता 2094 रुपये होणार आहे.
  • एक ते दीड हजार सीसी इंजिन असलेल्या खासगी वाहनांचा प्रीमियम 3221 रुपयांवरुन 3416 रुपये असेल..
  • दीड हजारांहून अधिक सीसीच्या खासगी वाहनांच्या प्रीमियममध्ये घट केलीय. 7897 रुपयांवरुन 7890 रुपये असेल.
  • 150 ते 350 सीसीपर्यंत दुचाकीसाठी 1366 रुपये असतील.
  • 350 हून अधिक सीसी दुचाकीसाठी 2804 रुपये मोजावे लागतील.

– दरम्यान, हायब्रिड इलेक्ट्रीक वाहनांच्या प्रीमियमवर 7.5 टक्के सूट दिली आहे. खासगी इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक पॅसेंजर गाड्यांसाठी ‘इन्शुरन्स’वर 15 टक्के सूट दिली जाणार आहे. 30 किलो ‘व्हॅट’हून अधिक इलेक्ट्रीक खासगी वाहनांवरील प्रीमियम 1780 रुपये असेल.

– तसेच 12 हजार ते 20 हजार किलो मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांना वाहनांसाठी प्रीमियम 35,313 रुपये भरावे लागतील.
– 40 हजारांहून अधिक किलो मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी प्रीमियम 44,242 रुपये भरावे लागतील.
– 30 किलोहून अधिक व्हॅट प्रीमियम इलेक्ट्रिक वाहनांसाठी 2904 रुपये द्यावे लागतील.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement