SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

महत्वाची बातमी : मार्क झुकरबर्गवर मोठा आरोप; बसणार अविश्वसनीयतेचा फटका

मुंबई :
मार्क झुकरबर्ग हे आपल्या सर्वांच्या आवडीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचे सह संस्थापक व मेटा कंपनीचे प्रमुख आहेत. मेटा ही व्हॉट्स अप, इंस्टाग्राम व फेसबुक मूळ आहे. नुकताच त्यांच्यावर परवानगीशवाय फेसबुक यूजर्सचा डेटा गोळा केल्याचा आरोप केला गेला आहे.

 

 

Advertisement
सोमवारी म्हणजेच परवा त्यांच्यावर डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाने (डीसी) गुन्हा दाखल केला आहे. केंब्रिज अॅनालिटिका घोटाळ्यात वैयक्तिकरित्या जबाबदार धरत मार्क झुकरबर्ग यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, कोट्यवधी फेसबुक युजर्सच्या डेटाच्या गोपनीयतेच्या उल्लंघनाशी संबंधित असल्यामुळे याला कॉर्पोरेट आणि राजकीय घोटाळाचे स्वरुप दिले जात आहे.

 

 

Advertisement
कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये मार्क झुकरबर्गचा थेट सहभाग असल्याचा आरोप आहे. युजर्सची गोपनीय माहिती शेअर करण्याचे धोके माहीत असतानाहीतसेच, केंब्रिज अॅनालिटिकाचे कमीत कमी 8.70 कोटी फेसबुक युजर्सचा डाटा त्यांच्या परवानगीशिवाय गोळा केला, आणि अमेरिकेतील 2016 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीवर कथितपणे प्रभाव टाकण्यासाठी याचा वापर करण्यात आला होता, असा आरोप मार्क झुकरबर्ग यांच्यावर करण्यात आला आहे.

 

 

Advertisement
2012 पासून मार्क झुगरबर्गकडे फेसबुकचे 50 टक्क्यांहून अधिक वोटिंग शेअर आहे. इतकंच नव्हे तर, जगातील सर्वात मोठ्या इंटरनेट कंपनीच्या कामकाजावर त्यांचे संपूर्ण नियंत्रण आहे. आज जगभरात फेसबुक युजर्सची संख्या तीन अब्जांच्या पुढे गेली आहे. मेटाचे बाजार मूल्य 500 अब्ज डॉलर पेक्षा जास्त अंदाजे आहे. रेझिनने झुकरबर्ग यांच्याकडून नुकसान भरपाई आणि दंड मागितला आहे, जो चाचणी दरम्यान निश्चित केला जाईल. मेटा प्लॅटफॉर्मचे प्रवक्ते अँडी स्टोन यांनी याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.