SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

रिषभ पंतला क्रिकेटपटूने लावला कोट्यवधींचा चुना, महागड्या घडाळ्याचा नाद भोवला..!

भारतीय संघातील धडाकेबाज विकेटकिपर बॅट्समॅन रिषभ पंत याला महागडे घड्याळं स्वस्तात खरेदी करण्याचा मोह चांगलाच महागात पडला. हरियाणाच्या एका क्रिकेटपटूनेच ऋषभ पंतची फसवणूक केली. त्यानं तब्बल 1.63 कोटीचा चुना पंतला लावला. मृणांक सिंह असं या आरोपीचं नाव आहे.

याबाबत पंत व त्याचा मॅनेजर पुनीत सोलंकी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.. त्यानुसार पोलिसांनी मृणांकविरोधात गुन्हा दाखल केला.

Advertisement

दरम्यान, दुसऱ्या एका गुन्ह्यात मृणांक सिंह याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो त्या गुन्ह्यात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आता पंत याच्या फसवणूकप्रकरणी दिल्लीच्या एका कोर्टानं मृणांकला हजर करण्यासाठी आर्थर रोड जेल प्रशासनाला नोटीस पाठवलीय..

मंकीपॉक्स आजार किती धोकादायक आहे? या आजाराचे लक्षणे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे

Advertisement

नेमकं काय घडलं..?
जानेवारी 2021 मध्ये आरोपी मृणांक याने पंत व त्याच्या मॅनेजरला महागडी घड्याळं, बॅग व दागिने खरेदी-विक्रीचा व्यवसाय सुरु केल्याचे सांगितलं. तसेच इतर काही खेळाडूंनाही ही घड्याळे, स्मार्टफोन अगदी स्वस्तात विकली असल्याचे त्याने पंतला सांगितले. पंतने त्याच्यावर विश्वास ठेवला.

‘फ्रॅन्क मुलर वॅनगार्ड याचिंग’ सीरिजचं घड्याळ पंतला घ्यायचं होतं.. त्यासाठी त्याने आरोपी मृणांकला 36,25,120 रुपये दिले. शिवाय, ‘रिचर्ड मिल’च्या एका घड्याळासाठी त्यानं 62,60,000 रुपये आणखी दिले. भारतीय संघातील काही खेळाडूंचा हवाला दिल्याने पंतनेही त्याच्यावर विश्वास ठेवला..

Advertisement

दरम्यान, याआधीही त्याने एका व्यावसायिकाला महागडी घड्याळं, मोबाईल स्वस्त दरात देण्याच्या आमिष दाखवून फसवले होते. या गुन्ह्यात सध्या तो मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. आता पंतनेही त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षी जानेवारीत ‘बाऊन्स चेक’च्या माध्यमातून त्याने पंतची 1 कोटी 63 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा दावा पंतच्या मॅनेजरने केला आहे..

आता या प्रकरणात दिल्लीतील एका कोर्टाने मुंबईच्या आर्थर रोड जेल प्रशासनाला नोटीस पाठवली असून, आरोपी मृणाल याला कोर्टासमोर हजर करण्याबाबतची सूचना केली आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement