SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार, टेलिकाॅम कंपन्या करणार ‘इतकी’ दरवाढ..?

टेलिकाॅम कंपन्यांनी गेल्या वर्षाच्या (2021) अखेरीस रिचार्ज प्लॅनच्या दरात मोठी केली होती. त्यात रिलायन्स जिओ (Jio), एअरटेल (Airtel), व्हाेडाफोन-आयडियाने (VI) अशा दिग्गज कंपन्यांनी त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांपर्यंत वाढ केली. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसली होती..

रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढून अवघे काही महिने झालेले असताना, या कंपन्या पुन्हा एकदा दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. आधीच्याच दरवाढीने ग्राहक हैराण झालेले असताना, पुन्हा एकदा रिचार्ज प्लॅनच्या दरवाढीची टांगती तलवार ग्राहकांवर आहे..

Advertisement

अमेरिकन इक्विटी रिसर्च फर्म, विल्यम ओ’नील अँड कंपनीच्या भारतीय युनिटमधील इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांच्या हवाल्यानं ‘ईटी टेलिकॉम’नं याबाबतचं वृत्त दिलंय. त्यानुसार, टेलिकॉम कंपन्या पुन्हा एकदा 10 ते 12 टक्क्यांनी आपल्या प्रीपेड प्लॅन्सचे दर वाढवणार असल्याचे सांगण्यात येते.

कधीपर्यंत होणार दरवाढ..?
टेलिकाॅम कंपन्यांनी ही दरवाढ केल्यास, एअरटेल 200 रुपये, जिओ 185 रुपये, तर व्हाेडाफोन-आयडीयाचा 135 रुपये प्रति ग्राहकांमागे सरासरी रेव्हेन्यू (ARPU) होणार असल्याचे सांगण्यात येते. अर्थात ही दरवाढ दिवाळीपर्यंत केली जाणार असल्याचे समजते..

Advertisement

गेल्या वर्षी नोव्हेंबर-2021 मध्ये एअरटेल व व्हाेडाफोन-आयडीयाने प्रीपेड प्लॅनच्या किंमतीत 20 ते 25 टक्के वाढ केली होती. त्यानंतर रिलायन्स जिओनेही किंमती वाढवल्या. त्यामुळे 79 रुपयांचा प्लॅन 99 रुपयांवर गेला, तर 84 दिवसांच्या वैधतेच्या ‘एअरटेल’च्या प्लॅनची किंमत 698 रुपयांवरून 839 रुपये झाली होती.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘एअरटेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विठ्ठल यांनी ‘प्रीपेड प्लॅन्स’च्या किंमती वाढवण्याचे संकेत दिले होते. प्रति युझर रेव्हेन्यू वाढवण्यासाठी ही दरवाढ केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.. त्यामुळे लवकरच ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार, हे निश्चित..!

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement