SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘या’ स्मार्टफोनवर ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ बंद होणार, त्यात तुमचा माेबाईल आहे का, वाचा..!

स्मार्टफोन युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे.. आज घडीला जगात सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग अ‍ॅप.. अर्थात व्हाॅटस् अ‍ॅप आता जुन्या आयफोनवर चालणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ने आपल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरु केली आहे..

‘व्हाॅटस् अ‍ॅप’ कंपनीच्या निर्णयानुसार, आता जुन्या ‘आयफोन’च्या व्हर्जनमध्ये ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ची काही फीचर्स बंद होणार आहेत. त्यात  iOS 10, iOS 11, iPhone5C आणि iPhone5 यांचा समावेश असून, त्यात आता ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ चालणार नाही.. तंत्रज्ञानात सतत होणारे बदल, युजर्सची सुरक्षितता नि ऑनलाइन धोके लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी NDA मध्ये नोकरीची संधी

अनेक फीचर्स बंद होणार..
आयफोनमधील (iPhones) जुन्या ‘आयओएस’ (iOS)मध्ये काही सुविधा बंद करण्याची घोषणा ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ने केली आहे. त्यानुसार, येत्या 24 ऑक्टाेबरपासून ‘व्हाॅटस् अ‍ॅप’चे काही फीचर्स जगभरातील जुन्या आयफोन युजर्ससाठी उपलब्ध नसतील.. अर्थात, केवळ जुन्या iOS व्हर्जनचा वापर करणाऱ्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे..

Advertisement

नव्या अपडेटनुसार, ‘iOS 10’ आणि ‘iOS 11’वर चालणाऱ्या सर्व डिव्हाइसवर ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ची सर्व फीचर्स चालणार नाहीत. मात्र, आयफोनच्या ‘iOS 12’चा वापर करणारे युजर्स ‘व्हाॅटस् अ‍ॅप’ची सर्व फीचर्स वापरु शकतात..

अर्थात, नव्या बदलानंतर ‘व्हाॅटस् अ‍ॅप’च्या कोणत्या सुविधा युजर्सला वापरता येणार नाहीत, याबाबत कंपनीने अजून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु, प्रतिक्रिया किंवा पेमेंटबाबत या सुविधा असण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येते..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement