सोने खरेदीचा विचार असल्यास तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे.. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मात्र, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आज (सोमवारी) सोन्या-चांदीच्या दरात (Todays gold silver rate) फारसा बदल झालेला नाही..
देशात 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 51,330 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याची किंमत 47,050 रुपये प्रति तोळा आहे. अर्थात, सोन्याचे हे दर सूचक असून, त्यात जीएसटी (GST), टीसीएस (TCS) व इतर शुल्काचा त्यात समावेश नाही. अचूक दरांच्या माहितीसाठी स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.
दरम्यान, चांदीच्या किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, चांदीच्या दरातही कोणताही बदल झालेला नाही. चांदीचा आजचा दर 61,400 रुपये प्रतिकिलो होता…
असं ओळखा शुद्ध सोने..
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी ‘आयएसओ’कडून (Indian Standard Organization) हॉलमार्क दिले जातात. त्यानुसार 24 कॅरेट सोन्यावर 999 लिहिलेलं असतं, तर 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेटवर 916, तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहिलेलं असतं. बाजारात बहुतांश सोन्याची विक्री 22 कॅरेटमध्ये होते.
24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते, तर 22 कॅरेट सोने हे अंदाजे 91 टक्के शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त अशा 9 टक्के इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले, तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात..