SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारची खास शिष्यवृत्ती योजना, ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करावे लागणार..!

अनेकदा बुद्धीमत्ता असूनही आर्थिक अडचणींमुळे काही विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता येत नाही. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाता येत नाही.. मात्र, आता तसे होणार नाही.. आर्थिक अडचणीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सरकारने खास योजना सुरु केली आहे. त्यामुळे पैशांअभावी आता विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही..

मुंबई इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी ‘विजाभज’, ‘इमाव’ व ‘विमाप्र’ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खास शिष्यवृत्ती देण्यात येते. 2022-23 या आर्थिक वर्षात परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

Advertisement

या शिष्यवृत्तीसाठी 23 जून 2022 पर्यंत विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयाचे संचालक डी. डी. डोके यांनी केलेय.

परदेश शिष्यवृत्तीसाठी अटी

Advertisement
  • विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
  • विद्यार्थ्यांचे पालक अथवा कुटूंबातील सर्व सदस्यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत ‘THE’ (Time Higher Education ) / आणि QS World University Ranking ही 200 च्या आतील असावी.
  • शिष्यवृत्ती द्यावयाच्या एकूण जागेपैकी 30 टक्के जागेवर मुलींची निवड करण्यात येईल.
  • विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभाग, शासन निर्णय 11 ऑक्टोबर 2018 मध्ये नमूद केल्याप्रमाणे अटी लागू राहतील.
  • अर्जाचा नमूना, शासन निर्णय व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in या संकेत स्थळावरील ‘रोजगार’ या लिंकवर क्लिक करावे..
  • विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र, राज्य पुणे-1 यांच्याकडे 23 जूनपर्यंत सायंकाळी 6:15 वाजेपर्यंत जमा करावेत..

कोणते लाभ मिळतात..?
– विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम.
– परदेशातील शैक्षणिक संस्थेने ठरवून दिल्याप्रमाणे, अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने ठरवल्याप्रमाणे अथवा महाराष्ट्र शासन जाहीर करील ती रक्कम वैयक्तिक आरोग्य विमा खर्च, विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता म्हणून दिली जाईल..
– विद्यार्थ्यांना परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर परत येताना विमान खर्च अनुज्ञेय असेल.

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement