SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुम्हाला मिळणार का 200 रुपयांची गॅस सबसिडी..? अनुदानाबाबत ‘असे’ जाणून घ्या..!

इंधनासह गॅस दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले होते. अखेर मोदी सरकारने गेल्या शनिवारी (ता. 21) घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी जाहीर केली. प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील 9 कोटींहून अधिक लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे. वर्षाला 12 सिलिंडरवर सबसिडी दिली जाणार आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना गॅस सबसिडी दिली जाते. तसेच, पती-पत्नीचे वार्षिक उत्पन्न 10 लाखांपेक्षा कमी असल्यास अनुदान दिले जात होते. अर्थात, प्रत्येक राज्यांत एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदानही वेगळे आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही सबसिडी बंद झाली होती.

Advertisement

मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो) दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यामुळे देशभरात घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना 1000 ते 1100 रुपये मोजावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये सरकारबद्दलचा रोष वाढत असल्याचे पाहून मोदी सरकारने पुन्हा एकदा गॅसमागे 200 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला.

12 वी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी NDA मध्ये नोकरीची संधी

Advertisement

सबसिडी अशी तपासा..

  • सुरुवातीला अधिकृत वेबसाइट http://mylpg.in/ वर लॉग इन करा.
  • स्क्रिनच्या डाव्या बाजूला तुमच्या कंपनीचा सिलिंडर निवडा.
  • साईन इन करण्यापूर्वी नवीन युजर पर्यायावर क्लिक करा.
  • तुमचा आयडी यापूर्वीच असल्यास साईन इन करा.
  • तुमच्याकडे आयडी नसल्यास पुन्हा नव्याने बनवा.
  • तुमच्या नोंदणीवर ‘सिलिंडर बुकिंग पाहा’वर क्लिक करा.
  • तुमची सिलिंडर संख्या व अनुदान तपशील पाहा.
  • सिलिंडरवर अनुदान मिळालेले नसल्यास फिडबॅक बटणावर क्लिक करा.

उज्जला गॅससाठी नोंदणी प्रक्रिया..
‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’चा लाभ फक्त महिलांनाच दिला जातो. ‘बीपीएल’धारक कुटुंबांनाच योजनेचा लाभ मिळतो. आतापर्यंत तुम्ही या योजनेसाठी नोंदणी केलेली नसल्यास, उज्ज्वला योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज डाऊनलोड करावा लागेल. तो अर्ज भरुन तुमच्या गॅस वितरकाकडे जमा करा. तुमच्या अर्जावर संपूर्ण पत्त्यासह जनधन खात्याचा तपशील द्यावा लागेल. कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला माफक दरात गॅस कनेक्शन दिले जाईल..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement