मुंबई :
अनेकदा आपले असे होते की, बँकांची कामे आपण सुट्टीच्या दिवशी ढकलतो पण योगायोगाने त्यादिवशी बँकेलाही सुट्टीच असते. मग आपल्या कामाचा खोळंबा होतो. आर्थिक कामाचा खोळंबा म्हणजे एकदम अवघड काम. म्हणूनच आपण बँकेच्या सुट्ट्या कधी असतात, हे नेहमीच लक्षात घ्यायला हवे, अन्यथा आपल्या आर्थिक कामाचा खोळंबा होणार, हे नक्कीच.
कधी कधी तर atm न वापरणाऱ्या लोकांना जास्तच अडचणी येऊ शकतात कारण ते पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी संपूर्णपणे बँकवर अवलंबून असतात. त्यामुळे आता बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण जून महिन्यात बँक तब्बल 12 दिवस बँकेचे (Bank) कामकाज बंद असणार आहे.
अशा आहेत बँकाच्या सुट्ट्या :-
- 2 जून (गुरुवार): महाराणा प्रताप जयंती/तेलंगणा स्थापना दिवस – हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, तेलंगणा
- 3 जून (शुक्रवार): श्री गुरु अर्जुन देव जी यांचा हुतात्मा दिवस – पंजाब
- 5 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- 11 जून (शनिवार): दुसरा शनिवार बँक सुट्टी
- 12 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- 14 जून (मंगळवार): पहिला राजा/संत गुरू कबीर जयंती – ओरिसा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, पंजाब
- 15 जून (बुधवार): राजा संक्रांती/वायएमए दिवस/गुरु हरगोविंद यांचा जन्मदिवस – ओरिसा, मिझोराम, जम्मू आणि काश्मीर
- 19 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- 22 जून (बुधवार): खारची पूजा – त्रिपुरा
- 25 जून (शनिवार): चौथा शनिवार बँक सुट्टी
- 26 जून (रविवार): साप्ताहिक सुट्टी
- 30 जून (बुधवार): रेमना नी – मिझोरम