SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

तुमचेही sbi मध्ये अकाउंट असेल तर तातडीने करा ‘हे’ काम; अन्यथा भरावा लागेल दंड

पॅनकार्ड हे आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वाचं आर्थिक व पडताळणीसाठीचे डॉक्युमेंट बनलेलं आहे. कोणतंही आर्थिक काम आता पॅनकार्ड शिवाय अशक्य आहे. आयकर रिटर्न (ITR) भरण्यापासून ते बँक खातं उघडणं, व्यवसाय सुरू करणं आणि मालमत्तांची खरेदी-विक्री करणं, यासह अनेक बाबींसाठी पॅन कार्ड आता आवश्यक झालं आहे.

आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणं आता अनिवार्य आहे. खाते धारकांनी या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यास दंड होऊ शकतो. जर आपलं SBI मध्ये सेव्हिंग्ज अकाउंट असेल आणि पॅन कार्ड त्या खात्याशी लिंक केलं नसेल, तर हे काम त्वरित करून घ्या. अन्यथा तुम्हाला आर्थिक दंडाचा सामना करावा लागेल.

इंटरनेट बँ किंगद्वारे SBI बचत खात्याशी पॅन कार्ड कसं लिंक करावं, हे सविस्तर जाणून घ्या खालीलप्रमाणे :


एसबीआयच्या खात्याशी पॅनकार्ड लिंक करण्यासाठी सर्वांत आधी अधिकृत वेबसाइट www.onlinesbi.com ला भेट द्या.

त्यांनतर माझी खाती आणि प्रोफाइल-पॅन नोंदणी वर जा.

अकाउंट नंबर आणि पॅन क्रमांक निवडा आणि सबमिटवर (Submit) क्लिक करून Registration वर जाणे.

अकाउंट नंबर आणि पॅन क्रमांक निवडून सबमिटवर (Submit) क्लिक करा.

आपली Request आता SBI शाखेकडे प्रॉसेसिंगसाठी पाठवली जाते.

त्यानंतर Request वर 7 दिवसांच्या आत प्रक्रिया केली जाईल.

लिंकिंगच्या स्थितीबद्दल तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर माहिती दिली जाते.

Advertisement