SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

उंची वाढविण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय, तज्ज्ञ काय म्हणतात..?

प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात उंची महत्वाची असते.. उंच व्यक्तीची नकळत छाप पडते, त्यामुळे आपण छान उंच असावे, असे अनेकांना वाटतं. पण अनेकदा फार प्रयत्न करुनही उंची काही वाढत नाही. मुलांच्या वाढीच्या वयात त्यांची उंची चांगली वाढली, तरच ती वाढते. आहार, लाईफस्टाईल, व्यायाम या गोष्टींचा मुलांच्या उंचीवर परिणाम होत असतो..

डॉ. मिकी मेहता यांनी उंची वाढवण्यासाठी करता येतील, असे काही व्यायाम प्रकार सांगितले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

Advertisement

उंची वाढवण्यासाठी करा हे व्यायाम
– भिंतीला आपले पोट लागेल, असे उभे राहा. हाताच्या बोटांनी हळूहळू वर चढल्यासारखे करा. पायाच्या टाचा उचलून चवड्यांवर उभे राहा.. तसेच हळुहळू खाली या.. हा व्यायाम 5 ते 6 वेळा करा. त्यामुळे पायाच्या सगळ्या अवयवांना ताण पडेल.. नकळत उंची वाढण्यासाठी त्याचा फायदा होईल.

– पाठीचा मणका भिंतीला टेकून उभे राहा. दोन्ही पायांमध्ये खांद्याइतके अंतर घ्या. हात वर करा नि मोठा श्वास घेऊन कंबरेत वाकून हाताने पायाचे अंगठे धरण्याचा प्रयत्न करा. 5 ते 7 वेळा ही क्रिया केल्यास स्नायू ओढले जाऊन उंची वाढू शकते.

Advertisement

– खाली बसा नि उठताना उंच उडी मारा. पुन्हा खाली बसून बाऊ्स झाल्यासारखी उंच उडी मारा. अशा प्रकारे ताण दिल्यानेही उंची वाढण्यास मदत होऊ शकते.

– योगामधील भुजंगासन आणि पवन मुक्तासन ही आसनेही उंची वाढण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. नियमितपणे या आसनांचा सराव केल्यास त्याचा नक्कीच फायदा होईल.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement