मुंबई :
पेट्रोल-डीझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असताना केंद्र सरकारने सुखद धक्का देत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. त्यानंतर महाविकास आघाडी सत्तेत असलेल्या महाराष्ट्रात राज्य सरकारनेही इंधन दरात कपात केली. केंद्र आणि राज्य सरकारच्या या निर्णयाने सरकारच्या तिजोरीवर मात्र भर पडणार आहे. असे असले तरी सरकारच्या या निर्णयाने लोकांना दिलासा मिळाला आहे. अशातच आता अजून एक खुशखबर समोर आली आहे.
कोरोना नंतर आता ‘या’ आजाराने वाढवली जगाची धाकधूक
मधल्या काळात तेलाचे भाव दुपटीने वाढले होते. मात्र आता आता कच्च्या घाणीच्या तेलात मोठी घसरण झाली आहे. इंडोनेशियाने निर्यात पुन्हा सुरू केल्याने किमतीत घट झाली आहे. इंडोनेशियाच्या या निर्णयाचा देशांतर्गत बाजारपेठांवर परिणाम झाला आहे. देशातील बाजारपेठेत गेल्या 6-7 दिवसात तेलाच्या दरात घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. तसेच मागील आठवड्यात बहुतांश तेलबियांच्या किमती कमी झाल्या आहेत. परिणामी मोहरीचे तेल 40 रुपयांनी स्वस्त झाले आहे. खाद्यतेलाच्या दरातील ही मोठी घसरण मानली जात आहे.
गेल्या आठवड्यात परदेशातील बाजारातील वाढीव किंमतीमुळे कच्च्या पाम तेलाचे भावही 500 रुपयांनी घसरून 14,850 रुपये प्रति क्विंटल, पामोलिन कांडला 520 रुपयांनी घसरून 15,200 रुपये झाले. मोहरी दादरी तेल क्विंटलमागे 250 रुपयांनी घसरून 15050 रुपये झाले.