मुंबई :
जर आपणही सेवानिवृत्त असाल आणि तुम्हाला नियमितपणे पेन्शन मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. संरक्षण मंत्रालयाने संरक्षण निवृत्तीवेतन धारकांना नियमित मासिक पेन्शन मिळवण्यासाठी पाच दिवसांत एक काम पूर्ण करण्यास सांगितलं आहे. पेन्शनधारकांना त्यांची वार्षिक ओळख 25 मेपर्यंत पूर्ण करण्याचा मेसेज देण्यात आला आहे. त्यामुळे पेन्शनधारकांनी त्यांची वार्षिक ओळख पूर्ण न केल्यास त्यांचे पेन्शन मिळणे बंद होऊ शकते.
सरकारने याबाबत नुकतेच जारी केलेल्या नियमानुसार, आत्तापर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार 43.774 संरक्षण निवृत्तीवेतनधारक ऑनलाइन प्रणाली SPARSH मध्ये स्थलांतरित झाले असून त्यांनी अजुन वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या संरक्षण मंत्रालयाने निवृत्ती वेतनधारकांना 25 मेपर्यंत वार्षिक ओळख पूर्ण करण्याचा मेसेज देण्यात आला आहे. अन्यथा पेन्शनधारकांनी वार्षिक ओळख पूर्ण न केल्यास त्यांचे पेन्शन मिळणे बंद होऊ शकते.
2016 पूर्वी निवृत्त झालेले पेन्शन धारक अजूनही जुन्या पद्धतीने पेन्शन सेवा घेत आहे, अजुन पर्यंत 1.2 लाख पेन्शनधारकांनी कोणत्याही प्रकारे त्यांची वार्षिक ओळख पूर्ण केलेली नाही.
हे घ्या लक्षात :-
- पेन्शनधारक वार्षिक ओळख पूर्ण करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देणे.
- जुन्या पेन्शनधारकांनी जीवन प्रमाण अद्ययावत करण्यासाठी त्यांच्या बँकेशी संपर्क साधावा.