मुंबई :
एलआयसी हा सर्व गुंतवणूकदारांसाठी अत्यंत विश्वासार्ह पर्याय आहे. एक सुरक्षित व खात्रीशीर गुंतवणूक म्हणून एलआयसीकडे बघितले जाते. या कंपनीकडे आपल्या प्रत्येक वर्गातील ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूक योजना आहे.
नुकतेच, एलआयसीने एक पॉलिसी लाँच केली आहे. तिचे नाव आहे एलआयसी जिवन लाभ पॉलिसी(LIC Jeevan Labh Policy). ही एक अशी पॉलिसी आहे, ज्यात आपण दर महिन्याला केवळ 233 रुपये जमा करुन 17 लाखांचा मोठा फंड मिळवू शकतो. या पॉलिसीचा शेअर मार्केटशी कोणताही संबंध नसून मार्केट वर-खाली झाल्यास आपल्या गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही. या स्कीममध्ये आपले पैसे पूर्णपणे सुरक्षित राहतात. हा एक लिमिटेड प्रिमियम प्लॅन आहे.
या योजनेची वैशिष्ट्ये खालीप्रमाणे :-
- एलआयसीची जीवन लाभ पॉलिसी नफा आणि सुरक्षा दोन्ही देते.
- ही पॉलिसी 8 ते 59 वयोगटातील कोणती ही व्यक्ती घेवु शकते.
- 16 ते 25 वर्षांपर्यंत पॉलिसी टर्म घेता येते.
- कमीत-कमी दोन लाख रुपयांचा सम एश्योर्ड घ्यावा लागतो. अधिकाधिक रकमेची कोणतीही मर्यादा नाही.
- 3 वर्षांपर्यंत प्रीमियम भरल्यानंतर लोनची सुविधाही उपलब्ध आहे.
- प्रीमियमवर टॅक्स सूट असून पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर नॉमिनीला विम्याची रक्कम आणि बोनस लाभही मिळतो.
- जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी काळात झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रीमियम जमा केला असेल, तर त्याच्या नॉमिनीला मृत्यूनंतर विमा रक्कम, सिंपल रिवर्सनरी बोनस आणि फायनल एडिशन बोनस मिळतो. म्हणजेच नॉमिनीला अतिरिक्त विमा रक्कम मिळेल.
- अशा प्रकारे ही अत्यंत सुरक्षित अशी योजना आहे. आपला उद्याचा दिवस सुखी व आनंदी बनवण्यासाठी आजपासूनच दर महिन्याला 233 रुपयांची गुंतवणूक करा व टेन्शन फ्री व्हा.