SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

कोरोनानंतर आणखी मोठ्या आजाराचे सावट, राज्य सरकारकडून नियमावली जाहीर…!

कोरोनातून जग आता कुठे सावरत असताना, पुन्हा एकदा मोठं संकट कोसळलं आहे. कोरोनानंतर ‘मंकी पाॅक्स’ या आजारानं जगभर थैमान घातलंय.. जगभरातील अनेक देशांमध्ये ‘मंकीपॉक्स’ची (Monkeypox Virus) लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत.

जगभर ‘मंकीपॉक्स’ आजाराचे रुग्ण वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर व देशाच्या सीमा भागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

सध्या भारतात ‘मंकीपॉक्स’चा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, इतर देशांतील प्रकरणे पाहता, केंद्र सरकार सावध झाले आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्कतेचे निर्देश दिले आहेत. केंद्राच्या सूचनेनंतर महाराष्ट्राचा आरोग्य विभागही सतर्क झाला असून, नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्वे (Advisory) जारी केली आहेत.

राज्य सरकारची मार्गदर्शक तत्वे

Advertisement
  • गेल्या 21 दिवसांत प्रभावित देशांमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
  • संशयित रुग्णांची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांकडून तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना केल्या आहेत.
  • संशयित रुग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळल्या पाहिजेत.
  • रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ सुरू केले जाईल.
  • रक्ताची थुंकी व संशयित रुग्णांचे नमुने एनआयव्ही, पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
  • गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब क्वारंटाईन केले जाईल.
  • संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होत नाहीत, त्वचेचा नवीन थर तयार होत नाही, तोपर्यंत क्वारंटाईन राहावे लागेल.

कॉफी पिण्याचे फायदे घ्या जाणून

‘मंकीपॉक्स’ची लक्षणे

  • ‘मंकीपॉक्स’ हा एक दुर्मिळ विषाणूजन्य आजार आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जशी सामान्य लक्षणे दिसतात, तशीच लक्षणे यात दिसून आली आहेत.
  • संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर, चेहऱ्यावर पुरळ दिसते.
  • याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे व थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.

असा वाढतो संसर्ग..
‘मंकीपॉक्स’ संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्याचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्ग किंवा डोळे, नाक आणि तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतो. संक्रमित प्राणीही या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्यास, तसेच विषाणू-दूषित वस्तूंद्वारेही ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. आंतरराष्ट्रीय प्रवास किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरत असल्याचे आढळून आले आहे..

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement