SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

11 वीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!

मुंबई :

ज्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे आणि ज्यांना अकरावीत प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. अकरावीप्रवेशा संदर्भात ही महत्त्वाची अपडेट आहे. काही दिवसांपूर्वी राज्याच्या शिक्षण विभागाने (Maharashtra Education Department) यंदाच्या अकरावी प्रवेश (11th Admission) परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. त्यानंतर आता अजून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अकरावीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. आणि ऑनलाईन नोंदणी अर्जप्रक्रियेची तारीख आलेली आहे. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे.

Advertisement

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशासाठी सराव अर्ज भरण्याचा मॉक राउंड सोमवारपासून (23 मे 2022) सुरू झाला आहे आणि रविवार (29 मे 2022) पर्यंत तो सुरु राहणार आहे. मुंबई महानगर प्रदेश (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी अकरावीमध्ये (Maharashtra FYJC Admissions 2022) प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी 30 मे 22 पासून ऑनलाईन अर्जप्रकिया सुरू होणार आहे.

 

Advertisement

महत्वाची बाब म्हणजे ही जी प्रवेश प्रक्रिया आहे ती 2 टप्प्यांमध्ये असणार आहे. पहिल्या टप्प्यात म्हणजेच भाग-I 30 मे पासून सुरू होणार आहे. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकतील. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येईल.

Advertisement