SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

‘हर घर झेंडम’… मोदी सरकारचा अनोखा उपक्रम, प्रत्येकाला करावं लागेल ‘हे’ काम…!

भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव देशभर जल्लोषात साजरा होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणारे स्वातंत्र्यसेनानी, सैनिकांचे स्मरण करतानाच नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी यंदाचा स्वातंत्र्यदिन वेगळ्या पद्धतीनं साजरा केला जाणार आहे.

केंद्र सरकारने त्यासाठी एक खास योजना आखलीय. त्यानुसार, येत्या 11 ते 17 ऑगस्टदरम्यान देशातील 10 कोटी घरांवर सलग 7 दिवस राष्ट्रध्वज (तिरंगा) फडकावला जाणार आहे. त्यासाठी ‘हर घर झेंडम’ (घरोघरी राष्ट्रध्वज) अभियान राबविले जाणार आहे. जनतेत देशभक्तीची भावना जागृत करण्याची केंद्र सरकार हा उपक्रम राबवणार आहे.

Advertisement

भारताची लोकसंख्या 130 कोटींपेक्षा अधिक आहे. देशात एकूण घरांची संख्या सुमारे 10 कोटींच्या आसपास असू शकते. या सर्व घरांवर सलग 7 दिवस तिरंगा फडकाविण्यात येणार आहे. दरम्यान, केंद्राच्या या उपक्रमात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही तयारी सुरु केली आहे. राज्यात एक ते सव्वा कोटी घरांवर तिरंगा फडकाविण्यासाठी राज्य सरकार आतापासूनच तयारीला लागले आहे.

सरकारी यंत्रणेसमोरील आव्हाने
प्रत्येक घरावर तिरंगा फडकाविण्यासाठी सरकारी यंत्रणेला मोठी कसरत करावी लागणार आहे.. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, पुढील 3 महिन्यांत 10 कोटींपेक्षा अधिक झेंडे तयार करण्याचे आव्हान असेल. तिरंगा किती आकारात असावा, याची तरतूद राष्ट्रध्वजाच्या संहितेत केली आहे. घरावर तिरंगा फडकावताना प्रत्येकाला त्याचे पावित्र्यही जपावे लागणार आहे.

Advertisement

ग्रामीण, आदिवासी भागात ध्वजसंहितेबाबत तितकीशी जागृती झालेली नाही. त्यामुळे सलग 7 दिवस सकाळी राष्ट्रध्वज फडकावणे व सायंकाळी पुन्हा राष्ट्रध्वज उरविणे, राष्ट्रध्वज फाटणार नाही, त्याचा अवमान होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी लागणार आहे.

भारतीय ध्वज संहितेमध्ये 2006 मध्ये काही बदल झाले आहेत. या बदलानुसार देशातील कोणतीही व्यक्ती, खासगी संघटना, शैक्षणिक संस्थानाही राष्ट्रध्वज फडकाविण्याचे अधिकार दिले आहेत. हा राष्ट्रध्वज हाताने कातलेल्या व हाताने विणलेली लोकर, सूत, सिल्क, खादी कापडापासून बनविलेला असावा, प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज वापरु नये, असे ध्वजसंहितेत नमूद केलेले आहे.

Advertisement

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement