SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

🔯 आजचे राशिभविष्य: तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या..

मेष (Aries): व्यावहारिक दृष्टिकोन बदलावा लागेल. आठवडय़ाच्या सुरुवातीला मनाविरुद्ध कामे करावी लागतील. वरिष्ठांसोबत भाष्य करताना तारतम्य ठेवा. सेवावृत्तीने कामे हाती घ्याल. फक्त स्वत:चा विचार करू नये. कौटुंबिक प्रेम वाढीस लागेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

वृषभ (Taurus): राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या बाजूने बोलणारे लोक डळमळीत होण्याची शक्यता आहे. व्यवहारात चूक करू नका. कष्टाला मागे-पुढे पाहू नका. मौल्यवान वस्तु जपून ठेवाव्यात. छोट्या मोठ्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. मित्रपरिवारासह वेळ घालवा.

मिथुन (Gemini) : क्षुल्लक अडचणी येतील. वाद वाढवू नका. नोकरी-धंद्यात मनाप्रमाणे सुधारणा कराल. कर्जाचे काम करून घ्या. स्पर्धेत अव्वल राहाल. राजकीय विषयांमध्ये स्थिती सुखद राहील. अधिकार क्षेत्रात वाढ होईल. इच्छित योजनेला अमलात आणण्याचे प्रयत्न करा. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

कर्क (Cancer) : मानसिक, शारीरिक दडपण वाढेल. रागावर ताबा ठेवा. उद्योग धंद्यात मोठे काम मिळण्याची शक्यता. राजकीय, प्रतिष्ठा जपण्यासाठी तडजोड करा. हुशारीने गुंतवलेले धन आपणास ध्येयाजवळ घेऊन जाईल. जोखिम असलेले कार्ये टाळा. शांत राहाण्याचा प्रयत्न करा. मान व प्रतिष्ठा लाभेल. पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाबाबत हलगर्जीपणा नको.

Advertisementसिंह (Leo) : अहंकार न ठेवता काम करा. नोकरीत वरिष्ठांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दा पटवून द्यावा लागेल. स्पर्धा जिद्दीने लढा. अनुभवांना समजण्याची आवश्यकता आहे. तुमची धार्मिकता वाढीस लागेल. आत्मविश्वासाने कामे हाती घ्याल. काहींना कामात अडचणी जाणवतील. परिवारासंबंधित कामे पूर्ण करा. प्रकृतीकडे लक्ष द्या आणि वेळेवर आजाराचे निदान करा.

कन्या (Virgo) : समस्या कोणते वळण घेईल हे सांगणे कठीण आहे. शारीरिक, मानसिक तोल सावरणे महत्त्वाचे आहे. भावनेच्या आहारी गेल्यास व्यवहारात चूक होईल. सर्वांशी आनंदाने वागाल. हसत-खेळत कामे कराल. चांगला व्यावसायिक लाभ मिळेल. प्रवास शक्यतो टाळावेत. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीशी वाद घालू नको.

तुळ (Libra) : राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहकारी, नेते यांना गृहित धरू नका. अपेक्षा ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे दबावतंत्र उपयोगी पडेल. कुटुंबातील लोकांमध्ये पैशांना घेऊन आज वाद होऊ शकतात. नवीन संधी मिळतील. आरोग्य मध्यम राहील. प्रियजनांचा सहवास लाभेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. घरातील ताणतणामुळे त्रास होण्याची शक्यता आहे.

वृश्‍चिक (Scorpio) : कोणताही प्रश्न सोडवता येईल असे समजू नका. योग्य ठिकाणी गुंतवणूक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांच्या विरुद्ध जाऊ नका. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. गंभीर आणि योजनाबद्ध प्रयत्नांनी आपणास यश आणि आनंद मिळेल. तुमच्या कामामध्ये आज कोणी आडवे येणार नाही, याची काळजी घ्या. मित्रपरिवारासह आदराने वागा.

Advertisementधनु (Sagittarius) : राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागेल. गैरसमज निर्माण होतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. पोरकटपणा करणे टाळा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. यामुळे तुम्ही नवीन मित्र जोडाल. संपर्क वाढवाल. महत्त्वाचे आर्थिक निर्णय मार्गी लागतील. घरातील मंडळींची साथ लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

मकर (Capricorn) : तुमचे विधान वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाद, तणाव निर्माण होतील. नवीन परिचय उत्साहवर्धक असतील. व्यवसाय वाढेल. तुमची समाजप्रियता वाढीस लागेल. कामात मित्रांची मदत होईल. नवीन ओळखी वाढतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील. घरातील मंडळींचे विचार पटणार नाहीत. मित्र मंडळीची गाठभेट होण्याची शक्यता आहे

कुंभ (Aquarious) : व्यवसायात नवी संधी मिळेल. नोकरीत वरिष्ठांच्या कामात साहाय्य करावे लागेल. राजकारणात प्रतिष्ठा मिळेल व धाडसाचे कौतुक होईल. हातातील कामात यश येईल. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. पैसा कारणी लागेल. नोकरीत आज प्रश्नांची सरबत्ती होईल पण मार्ग काढाल. आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो.

मीन (Pisces) : राजकीय, सामाजिक क्षेत्रातील महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रतिष्ठा संपवण्याचा प्रयत्न होईल. सहनशीलता ठेवा. खरेदी-विक्री व्यवहारात फायदा होईल. घरातील वातावरण आनंददायी राहील. तुमचा मनमोहक स्वभाव आणि आनंदी व्यक्तिमत्व घर प्रफुल्लित ठेवेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. जिद्दीने कार्यरत राहाल. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

Advertisement