SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त..! ‘या’ राज्यांनीही केली कर कपात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतात..?

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलच्या अबकारी करात मोठी कपात करण्याचा निर्णय शनिवारी (ता. 21) घेतला होता. केंद्र सरकारने पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटरमागे 8 रुपये, तर डिझेलवर 6 रुपये प्रति लिटरने कमी केलं. त्याचा परिणाम लगेच आज दिसला..

करात कपात केल्याने पेट्रोल-डिझेल आज स्वस्त झालेय. भारतीय तेल कंपन्यांनी आज (रविवारी) पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले. देशातील सर्वात मोठी ‘ऑइल मार्केटिंग’ कंपनी ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’च्या नव्या दरानुसार, दिल्लीत पेट्रोल दर 96.72 रुपये प्रति लिटर (Petrol Diesel Prices)झाला, तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर इतका दर होता.

Advertisement

केंद्र सरकारने उत्पादन शुल्क कमी झाल्याने आज पेट्रोल 8.69 रुपये, तर डिझेल 7.5 रुपये स्वस्त झालंय. दरम्यान, मोदी सरकारने करात कपात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यांनाही त्यांचा कर कमी करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, राजस्थान, केरळ व ओडिशा या राज्यांनीही इंधनावरील व्हॅट कमी केला. त्यामुळे त्या त्या राज्यात पेट्रोल व डिझेलचे दर आणखी कमी झाले आहेत..

प्रमुख शहरातील आजचे दर

Advertisement
शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १११.५८ ९६.०५
अकोला १११.४२ ९५.९२
अमरावती १११.८७ ९६.३५
औरंगाबाद ११३.०३ ९८.९५
भंडारा ११२.२० ९६.६८
बीड १११.८१ ९६.२७
बुलढाणा १११.५४ ९६.०४
चंद्रपूर १११.१६ ९५.६९
धुळे १११.८० ९६.२७
गडचिरोली १११.९६ ९६.४६
गोंदिया ११२.८९ ९७.३३
हिंगोली ११२.०३ ९६.५१
जळगाव १११.४४ ९५.९२
जालना ११२.९९ ९७.४०
कोल्हापूर १११.३२ ९५.८२
लातूर ११२.८४ ९७.२७
मुंबई शहर १११.३५ ९७.२८
नागपूर १११.४१ ९५.९२
नांदेड ११३.०७ ९७.५३
नंदुरबार ११२.५२ ९६.९६
नाशिक १११.८३ ९६.२९
उस्मानाबाद १११.८४ ९६.३१
पालघर १११.८० ९६.२३
परभणी ११३.९८ ९८.३५
पुणे ११०.९५ ९५.४४
रायगड १११.८५ ९६.२८
रत्नागिरी ११२.८५ ९७. २९
सांगली १११.४६ ९५.९५
सातारा १११.८७ ९६.३५
सिंधुदुर्ग ११२.९५ ९७.३९
सोलापूर १११.६७ ९६.१५
ठाणे १११.४९ ९७.४२
वर्धा १११.२७ ९५.७७
वाशिम १११.६२ ९६.११
यवतमाळ १११.५४ ९६.०५

 

दरम्यान, केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केल्यानंतर इतर काही राज्यांनीही कर कपात केली. त्यामुळे आता ठाकरे सरकार काय निर्णय घेते, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागलेले असताना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तसे कोणतेही संकेत दिलेले नाहीत.

Advertisement

मोदी सरकारवर टीका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, की “आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या नि नंतर नाममात्र दर कमी केल्याचा आव आणायचा, हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता, 6-7 वर्षांपूर्वी असलेला अबकारी कराइतकी कपात केली, तरच खऱ्या अर्थाने नागरिकांना दिलासा मिळेल. इंधनावरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवा होता..”

💰 आता व्हॉट्सअ‍ॅप / फेसबुकवर डील्स आणि न्यूज शेअर करून हजारो रुपये महिना कमवा! त्यासाठी लगेच Finjoy App डाउनलोड करा 👉 play.google.com/store/apps/details?id=com.spreadit.finjoy

Advertisement