SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

11 देशांमध्ये Monkeypox चा शिरकाव; भारतही ‘या’ लिस्टमध्ये सामील?

मुंबई :

कोरोनानंतर अजून एका विषाणूने जगाला हैराण केले आहे. मंकीपॉक्स या नव्याने आलेल्या व वेगाने पसरत असलेल्या व्हायरसचा धुमाकूळ आता 11 देशांमध्ये पसरला आहे. अलीकडेच 11 देशांमध्ये नोंदवलेले उद्रेक असामान्य आहेत, कारण ते स्थानिक नसलेल्या देशांमध्ये होत आहेत. आतापर्यंत 80 प्रकरणांची पुष्टी झाली आहे तर 50 तपास प्रलंबित आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ब्रिटन, अमेरिका, पोर्तुगाल, स्पेन आणि काही युरोपीय देशांमध्ये मंकीपॉक्स वेगाने पसरत आहे.

Advertisement

मंकीपॉक्स हा एक प्रकारचा प्राणीसंसर्गजन्य आजार मानला जातो. यामध्ये प्रामुख्याने प्राण्यांपासून मानवाकडे किंवा मानवाकडून प्राण्यांकडे मंकीपॉक्सच्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. मात्र, माणसांमध्ये तो इतक्या सहज वा वेगाने पसरू शकत नाही. बहुतांश रुग्ण हे मंकीपॉक्सची लागण झाल्यानंतर आठवड्याभरात बरे देखील होऊ शकतात. मात्र, काहींना गंभीर लक्षणं जाणवू शकतात.

मंकीपॉक्समुळे कांजण्यांसारखी लक्षणे दिसतात. पण ती कमी गंभीर आहेत. सुरुवातीला या विषाणूमुळे ताप, डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी,शरीरावर सूज, थंडी वाजून येणे आणि थकवा जाणवू शकतो. यामध्ये कांजण्यां सारखे पुरळ संपूर्ण शरीरावर येतात ज्याची सुरवात बहुतांश वेळा चेहऱ्यापासून होते. बीबीसीच्या मते, या पुरळांमध्ये सतत बदल होतात. शेवटी खपली तयार होण्यापूर्वी आणि ती खपली पडण्यापूर्वी हे वेगवेगळ्या टप्प्यांतून जातं.

Advertisement

संक्रमित रुग्णाच्या संपर्कात राहिल्याने हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. हा विषाणू फाटलेली त्वचा, श्वसनमार्ग, डोळे, नाक किंवा तोंडातून शरीरात प्रवेश करू शकतो. एवढेच नाही तर व्हायरसने दूषित झालेल्या वस्तू जसे की अंथरूण आणि कपडे यांच्या संपर्कातूनही त्याचा प्रसार होतो.

Advertisement