SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

लोडशेडींग संदर्भात सर्वात मोठी बातमी

मुंबई :

मागच्या काही महिन्यांपासून ग्रामीण, नीमशहरी आणि शहरी भागाला लोडशेडींगचा सामना करावा लागला. काही ग्रामीण भागात विजेचे संकट मोठे होते, त्यामुळे तिथे शेतकऱ्यांचे नुकसानही झाले. याचा फटका अगदी मोठ्या शहरांनाही बसला. हे संकट निवळण्याचे अनेक दिवस चिन्हे नव्हती. विजेची मागणी वाढत चालली होती आणि कोळशाचा पुरवठा तुलनेने खूपच कमी होत होता. त्यातही जागतिक स्तरावर अनेक घडामोडी घडत होत्या. या सगळ्यामुळे विजेचं संकट अधिकच गडद झालं होतं. मात्र आता लोडशेडींगबाबत सर्वात मोठी बातमी समोर आली आहे.

Advertisement

केंद्र सरकारने आता कोळसा आयात करण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आणि नागरिकांना लोडशेडींगचा सामना करावा लागणार नाही. कोळसा आयात करण्याबाबत दिलेल्या सूचनेनुसार महाजनकोने आयात कोळशाचा वापर सुरू केला आहे. केंद्राच्या (Central Government) परवानगीनंतर महाजनकोसाठी अदानी एंटरप्रायजेस, गांधार ऑइल रिफायनरी व मोहित मिनरल्स या तीन खासगी कंपन्यांनी आयात कोळशाचा पुरवठा सुरू केला आहे.

विजेचा वाढता वापर पाहता कोळशाची टंचाई पुढील दोन वर्षे राहण्याची शक्यता महाजनकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून अन्य राज्यांत भारनियमन सुरू झाले असले तरी आयात कोळशाच्या पुरवठ्यामुळे राज्यात भारनियमन टळल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement