बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अर्थात आमिर खान… एका वेळी एकाच चित्रपटावर अधिक काळ नि ‘परफेक्ट’ काम करण्याची आमिरची खासियत आहे. आपली भूमिका रुपेरी पडद्यावरही प्रेक्षकांना अगदी खरी वाटावी, यासाठी तो सतत प्रयत्न करीत असतो. त्यासाठी प्रत्येक चित्रपटात जीव ओतून मेहनत घेतो.
लवकरच आमिरचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बऱ्याच दिवसांनी आमिरचा चित्रपट येत असल्याने चाहत्यांनाही या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. चित्रपटाचे हटके प्रमोशन करण्यात आमिर माहिर आहे.. आता तर त्याने आपल्या ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमाच्या ट्रेलर लाँचसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
फायनलमध्ये ट्रेलर लाॅंच होणार
सध्या भारतीय चाहत्यांवर ‘आयपीएल’चे गारुड स्वार आहे. ही संधी साधून आमिरने एक नवी युक्ती लढवली आहे. यंदाच्या ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यात तो ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करणार आहे. ‘आयपीएल’मध्ये पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होत असेल..
AdvertisementView this post on Instagram
Advertisement
‘आयपीएल’ स्पर्धा आता अखेरच्या टप्प्यात असून, येत्या 29 मे ‘आयपीएल’चा अंतिम सामना होणार आहे. आपला चित्रपट जगभर पोहोचावा, यासाठी आमिर व चित्रपट निर्मात्यांनी ‘आयपीएल’चे व्यासपीठ वापरण्याचा निर्णय घेतला आहे.. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर यंदा आमिरचा जलवा पाहायला मिळणार आहे. स्टेडियममधील प्रेक्षकांसाठीही हे मोठं सरप्राईज असेल.
अंतिम सामन्याच्या ‘सेकंड हाफ’ दरम्यान ‘लाल सिंह चड्ढा’चा ट्रेलर ‘स्टार स्पोर्ट्स’ वाहिनीवर प्रदर्शित केला जाणार आहे. चित्रपट इतिहासात पहिल्यांदाच असा ट्रेलर लाँच सोहळा पाहायला मिळणार असल्याचे बोललं जाते. हा चित्रपट येत्या सप्टेंबरमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यात आमिरबरोबर करीना कपूरही मुख्य भूमिकेत दिसेल.