SpreadIt News | Digital Newspaper
Digital Newspaper Marathi Website

पुणे तिथे काय उणे; मद्यपानातही अव्वल येत भर उन्हाळ्यात दिला एवढा महसूल

पुणे :

पुणे तिथे काय उणे, असे आपण नेहमीच म्हणत असतो. काहीही पुणे नंबर एकच असते. खेळण्यापासून शिकण्यापर्यंत, ज्ञानापासून तंत्रज्ञानापर्यंत, मानापासून अपमानापर्यंत पुण्यात सगळं काही ठासून भरल आहे. अशाच पुण्याने आता मद्यपानात सुद्धा माघार घेतलेली नाही. पुणे मद्यपानातही अव्वल ठरले असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे.

Advertisement

भर उन्हाळ्यात लोक उसाचा रस, लिंबू सरबत आणि इतर थंड द्रव्ये पिण्यात मश्गुल होते तेव्हा पुणेकर पद्धतशीर कार्यक्रम करण्यात जुंपलेले होते. पुणे जिल्ह्यात यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी संख्येने बियर विक्रीची नोंद झाली आहे. तब्बल 30 लाख लिटरने बियरच्या विक्रीत वाढ झाली आहे.

त्यामुळे पुणेकर आता तळीरामच्या स्पर्धेतही अव्वल आले आहेत. एवढचं नाहीतर पुणेकरांनी यावेळी सर्वात जास्त महसूल दारूच्या माध्यमातून सरकारला दिला आहे. बियर जास्त पिल्यामुळे महसूल आपोआप वाढला, परिणामी यातून 213 कोटींनी महसूलात (Revenue)वाढ झाली आहे. पुण्यात थंड बियरची विक्री होत असताना मात्र उर्वरित महाराष्ट्रात लिंबूने भाव खाल्ला.

Advertisement

महाराष्ट्रातील मद्यविक्री 2021-22 मध्ये परत वाढली आहे, विशेष म्हणजे 2020-21 च्या कोरोनाच्या काळात 2020 मध्ये, दारूची दुकाने आणि रेस्टॉरंट काही दिवस बंद राहिले, त्यानंतर मर्यादित वेळेसह पुन्हा उघडल्यानंतर उद्योगाला मोठा फटका बसला होता. अल्कोहोलच्या काही विभागांमध्ये वाढ मंदावली असली तरी, इतर बाजारपेठांच्या तुलनेत महाराष्ट्रातील व्यवसाय 2021-22 मध्ये अधिक वेगाने परत आल्याचे दिसते

Advertisement